चाणक्य नीती: या आठ गोष्टी चांगल्या असतील तर तुमचं आरोग्य उत्तम

Published : Dec 19, 2025, 02:14 AM IST
चाणक्य नीती: या आठ गोष्टी चांगल्या असतील तर  तुमचं आरोग्य उत्तम

सार

माझे शरीर पूर्ण निरोगी आहे का? मला कसे कळेल? त्याची लक्षणे कोणती?  हे जाणून घेण्यासाठी आठ मार्ग आहेत. चाणक्य नीतीमध्ये निरोगी राहण्याची ही आठ सूत्रे सांगितली आहेत. ती कोणती ते पाहूया…

माझे शरीर पूर्ण निरोगी आहे का? मला कसे कळेल? त्याची लक्षणे कोणती? असा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. अॅलोपॅथीमध्ये अनेक चाचण्या केल्या जातात. या खर्चिक चाचण्याची खरचं गरज आहे का? आयुर्वेद तज्ज्ञ तुमच्या आरोग्याची स्थिती समजून घेण्यासाठी काही सूत्रे देतात. चाणक्यांनी मानवी शरिराच्या आरोग्याचाही विचार केला आहे. यासाठी त्यांनी सांगितलेली ही सूत्रे एका सुंदर संस्कृत श्लोकात आहेत.

देहे सर्वत्र चौस्नस्य समता लाघवम् सुखम्

शुत तीक्ष्ण गध्न निद्रा च मानसोपि प्रसन्नता

शरीरे कर्मसामर्थ्यम् अनालस्या च कर्माशु

स्वत स्वेदो गं कले स्वास्थ्य लक्षणाति हि

याचा अर्थ आठ सुंदर सूत्रांमध्ये आहे.

1. दिवसातून एकदा सहज शौच होणे

दिवसातून एकदा सहज शौच झाले पाहिजे. शौचासाठी त्रास होऊ नये. मलाचा रंग विचित्र किंवा वास विचित्र नसावा. दररोज एका ठराविक वेळी शौचास व्हायला हवे. सकाळी झाल्यास उत्तम. यासाठी कोणतेही औषध किंवा गोळी घेण्याची गरज भासू नये. आपल्या शरीरातील नको असलेले पदार्थ आतच राहिले तर ते विषात रूपांतरित होतात.

2. शरीराचे वजन जास्त नसावे

शरीरातील टाकाऊ पदार्थ वेळोवेळी बाहेर पडत राहिल्यास, शरीर आपले वजन आवश्यकतेनुसार टिकवून ठेवते.

3. स्वच्छ त्वचा

आपल्या शरीरात काय चालले आहे, याची सूचक आपली त्वचा असते. आपल्या त्वचेवरील डाग, अकाली सुरकुत्या, मुरुमे हे शरीरात काहीतरी समस्या असल्याचे दर्शवतात.

4. आळस नसणे

निसर्गाने आपल्याला सकाळी पाच वाजता उठून रात्री दहा वाजेपर्यंत काम करण्याची ऊर्जा दिलेली असते. आपण मध्ये ब्रेक न घेता काम करू शकतो. पण जर ब्रेकची गरज वाटत असेल, थकवा जाणवत असेल, तर काहीतरी समस्या आहे, असे समजावे.

5. चांगली भूक लागणे

जेव्हा आपल्याला भूक लागते, तेव्हा ती चांगली आणि जोरदार लागली पाहिजे. भूक लागत नसेल तर याचा अर्थ आधीचे जेवण नीट पचलेले नाही. आपली पचनशक्ती चांगली असेल तर चांगली भूक लागतेच. दिवसातून किमान पाच वेळा तरी चांगली भूक लागली पाहिजे. हो, ही पोटाची भूक असावी, मनाची नाही.

6. शरीरात वेदना नसणे

कधी डोकेदुखी, कधी पाठदुखी, पायदुखी - अशा वेदना सतत होत असतील तर शरीरात काहीतरी समस्या आहे, असे समजावे. निरोगी माणसामध्ये वेदना नसतात.

7. गाढ झोप लागणे

लहान बाळासारखी झोप लागली पाहिजे. एखादे बाळ सोफ्यावर झोपले, तर सकाळपर्यंत आपण सोफ्यावर झोपलो होतो, याची त्याला जाणीवही नसते. निरोगी झोप म्हणजे तुम्हाला पडलेली स्वप्ने दुसऱ्या दिवशी आठवू नयेत. मध्यरात्री पंखा किंवा एसी बंद झाला तरी आपल्याला कळू नये.

8. सकारात्मक विचार

आपल्या आजूबाजूला अनेक गोंधळ सुरू असतात. दुःख, वेदना सर्व काही आहे. पण या सर्वांमुळे विचलित न होता, शांत स्वभाव आपल्यात असेल, सकारात्मक विचार येत असतील, तर तुम्ही निरोगी आहात, असा याचा अर्थ होतो.

 

 

 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

नवीन वर्षाला मुलीला गिफ्ट करा, कमी किंमतीत गोल्ड टॉप्सची करा खरेदी
८वा वेतन आयोग: किती मिळणार सॅलरी आणि किती होणार पेन्शन वाढ, जाणून घ्या माहिती