नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अंतर्गत कोणत्या पदांवर भरती होणार आहे. याची माहिती नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी जाणून घ्यावी.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अंतर्गत सध्या ‘उपनिरीक्षक’ [Sub Inspector] या पदासाठी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी नेमक्या किती जागा उपलब्ध आहेत ते इच्छुक उमेदवारांनी जाणून घ्या. तसेच या पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्रता निकष, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे याची माहिती पाहा.
पद आणि पदसंख्या
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये सध्या उपनिरीक्षक या पदासाठी एकूण १४ रिक्त पदासांठी भरती करण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता
उपनिरीक्षक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे, कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून किंवा विद्यापीठामधून पदवी शिक्षण पूर्ण केलेले असावे.
तसेच, संबंधित क्षेत्रात अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
वेतन
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या उपनिरीक्षक पदावर निवड झालेल्या उमेदवारास ९,३०० ते ३४,८०० रुपयांदरम्यान वेतन देण्यात येईल.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अधिकृत वेबसाइट
https://narcoticsindia.nic.in/
अधिसूचना
https://narcoticsindia.nic.in/vacancies/si.pdf
अर्ज आणि अर्ज प्रक्रिया
वरील पदावर उमेदवारांना नोकरीचा अर्ज करायचा असल्यास त्यांनी तो ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज पाठवताना उमेदवारांनी आपली संपूर्ण आणि अचूक माहिती भरणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी अर्जासह आवश्यक असल्यास महत्त्वाची कागदपत्रे जोडावीत.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी ५६ वर्षे अशी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.
उमेदवारांनी नोकरीचे अर्ज हे अंतिम तारखेआधी पाठवणे अनिवार्य आहे.
नोकरीचा अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख ही ७ जुलै अशी ठेवण्यात आली आहे.