Car Market: भारतातील सर्वात लोकप्रिय हॅचबॅकपैकी एक असलेल्या मारुती सुझुकी स्विफ्टच्या किमतीत वाढ झाली आहे. 5.78 लाख रुपयांपासून सुरू होणाऱ्या या गाडीच्या कोणत्या मॉडेलसाठी आता किती जास्त पैसे मोजावे लागतील, ते जाणून घेऊया.
मारुती सुझुकीच्या गाड्या भारतीय बाजारपेठेत प्रचंड लोकप्रिय आहेत. कमी किंमत, कमी मेन्टेनन्स आणि जास्त मायलेजमुळे लोक त्या पसंत करतात. यातही मारुती स्विफ्ट ही तरुणांपासून ते फॅमिलीपर्यंत सर्वांची आवडती कार आहे. आता याच लोकप्रिय गाडीच्या किमतीत बदल झाला आहे.
26
बेस मॉडेलच्या किंमतीत बदल नाही
मारुती सुझुकीने स्विफ्टच्या पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही व्हेरिएंटच्या किमती वाढवल्या आहेत. ही वाढ मॅन्युअल आणि एएमटी (AMT) दोन्ही मॉडेल्सना लागू आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे, गाडीच्या बेस मॉडेलच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. ते अजूनही 5.78 लाख रुपयांनाच मिळेल.
36
कोणतं मॉडेल किती रुपयांनी महागलं?
कंपनीने VXi, VXi (O), VXi AMT, VXi (O) AMT, ZXi MT, आणि ZXi AMT या मॉडेल्सच्या किमती 3,900 रुपयांनी वाढवल्या आहेत. तर VXi CNG, VXi (O) CNG, आणि ZXi CNG या सीएनजी व्हेरिएंटसाठी 7,400 रुपये जास्त मोजावे लागतील. सर्वात जास्त वाढ ZXi+ MT आणि ZXi+ AMT या टॉप व्हेरिएंटमध्ये झाली असून, या गाड्या 18,900 रुपयांनी महागल्या आहेत.
किंमत वाढली असली तरी, मारुतीने स्विफ्टच्या इंजिन किंवा फीचर्समध्ये कोणताही बदल केलेला नाही. यात पूर्वीप्रमाणेच 1.2 लीटर क्षमतेचे इंजिन आहे, जे 80.46 बीएचपी पॉवर आणि 111.7 एनएम टॉर्क जनरेट करते. गाडी 5-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्स पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
66
मायलेज मात्र जबरदस्त!
मारुती सुझुकीच्या गाड्या कमी किमतीसोबतच दमदार मायलेजसाठी ओळखल्या जातात. स्विफ्टचे मॅन्युअल पेट्रोल व्हेरिएंट एका लीटर पेट्रोलमध्ये 24.80 किलोमीटरचे मायलेज देते. तर सीएनजी व्हेरिएंट एक किलो गॅसमध्ये 32.85 किलोमीटरपर्यंत धावते.