Car Market: मारुती सुझुकी 5 जून रोजी आपली इथेनॉलवर चालणारी कार लाँच करणार आहे. या गाडीचा प्रति किलोमीटर खर्च फक्त 4 रुपये असेल असा दावा केला जात आहे. कमी खर्च आणि पर्यायी इंधन तंत्रज्ञानामुळे ही कार सध्या खूप चर्चेत आहे.
भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठे बदल घडवण्याची क्षमता या कारमध्ये आहे. वाढत्या पेट्रोलच्या दरामुळे त्रस्त असलेल्या ग्राहकांसाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. त्यामुळे या कारकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
24
इथेनॉल इंधन कार
हे तंत्रज्ञान परदेशात आधीपासूनच वापरात आहे. आता भारतीय रस्ते आणि इंधनाच्या स्थितीनुसार त्यात बदल करण्यात आले आहेत. आयात इंधनावरील अवलंबित्व कमी करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. जिथे इथेनॉल उपलब्ध नसेल, तिथे ही कार पेट्रोलवरही चालेल.
34
मारुती नवीन कार
या कारमुळे ग्राहकांना इंधन निवडीचे स्वातंत्र्य मिळेल. पण या गाडीची सर्वात मोठी खासियत म्हणजे तिचा कमी प्रवासाचा खर्च. एका किलोमीटरसाठी फक्त 3.5 ते 4 रुपये खर्च येईल असा अंदाज आहे. त्यामुळे सामान्य लोकांमध्ये याबद्दल मोठी उत्सुकता आहे.
या गाडीचा फायदा फक्त वाहनचालकांनाच नाही, तर शेतकऱ्यांनाही होऊ शकतो. ऊस, मका यांसारख्या पिकांपासून इथेनॉल तयार होते. त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते. तसेच, यामुळे वायू प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जन कमी होण्यासही मदत होईल.