Car Market: महिंद्राच्या या 7-सीटर नव्या गाड्या मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ!

Published : Jun 05, 2026, 09:10 PM IST

Car Market: महिंद्रा लवकरच 7-सीटर आणि 5-सीटर सेगमेंटमध्ये आपल्या नवीन गाड्या लाँच करण्याच्या तयारीत आहे. आधुनिक फीचर्स आणि नवीन टेक्नॉलॉजीसह येणाऱ्या या गाड्या बाजारात यशस्वी होतील का, याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

PREV
15
महिंद्रा पुढील पाच वर्षांत तब्बल 16 नवीन गाड्या लाँच करणार

भारतात एसयूव्ही गाड्यांची मागणी सातत्याने वाढत आहे. या मार्केटमध्ये आपली पकड आणखी मजबूत करण्यासाठी महिंद्राने एक मोठी योजना आखली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, कंपनी पुढच्या पाच वर्षांत तब्बल 16 नवीन गाड्या लाँच करणार आहे. त्यामुळे गाडीप्रेमींची उत्सुकता वाढली आहे.

25
स्कॉर्पिओ आणि 'व्हिजन एस' मॉडेल्स

या नवीन गाड्यांच्या यादीत 10 पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या आणि 6 इलेक्ट्रिक गाड्यांचा समावेश आहे. ग्राहकांची बदलती आवड लक्षात घेऊन कंपनी पारंपरिक आणि इलेक्ट्रिक अशा दोन्ही प्रकारच्या गाड्यांवर लक्ष केंद्रित करत आहे. विशेषतः लवकरच येणारी नवीन स्कॉर्पिओ आणि 'व्हिजन एस' या मॉडेल्सनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

35
नवीन स्कॉर्पिओच्या बाहेरील लूकमध्ये बदल

2026 मध्ये लाँच होणाऱ्या नवीन स्कॉर्पिओच्या बाहेरील लूकमध्ये काही बदल दिसू शकतात. यात रिफ्रेश केलेलं फ्रंट डिझाइन, नवीन व्हील आणि सुधारित लायटिंग सिस्टीम असण्याची शक्यता आहे. तसेच, गाडीच्या आतमध्ये मोठी टचस्क्रीन, नवीन ड्रायव्हर इन्फॉर्मेशन स्क्रीन आणि आधुनिक सुविधा दिल्या जाऊ शकतात.

45
'व्हिजन एस' गाडी
दुसरी महत्त्वाची गाडी म्हणजे 'व्हिजन एस'. ही गाडी महिंद्राच्या भविष्यातील डिझाइनची झलक दाखवेल अशी अपेक्षा आहे. चार मीटरपेक्षा कमी लांबीची ही गाडी शहरी तरुणांना आकर्षित करण्यासाठी डिझाइन केली जाऊ शकते. ही गाडी पेट्रोल, हायब्रीड आणि इलेक्ट्रिक अशा तिन्ही पर्यायांमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.
55
महिंद्राची विक्रीवाढही प्रभावी
या नवीन लाँचच्या मागे महिंद्राची विक्रीवाढही तितकीच प्रभावी आहे. कंपनीने गेल्या मे महिन्यात तब्बल एक लाख गाड्या विकून विक्रम केला आहे. विशेषतः एसयूव्ही गाड्यांना मिळालेला प्रतिसाद या वाढीमागे मुख्य कारण आहे. त्यामुळे येत्या काळात भारतीय ऑटो मार्केटमध्ये महिंद्राचा वाटा आणखी वाढेल, असा विश्वास तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
Read more Photos on

Recommended Stories