Car Market: SUV बाजारात महिंद्राची त्सुनामी! थार, स्कॉर्पिओसह 8 नव्या गाड्या येणार

Published : Jun 22, 2026, 09:50 PM IST

Car Market: महिंद्राच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आहे! महिंद्रा अँड महिंद्रा येत्या काळात तब्बल 15 पेक्षा जास्त नव्या एसयूव्ही (SUV) गाड्या लाँच करण्याच्या तयारीत आहे. जाणून घेऊयात याबद्दल अधिक

PREV
16
काय काय विशेष असणार?
यात पेट्रोल-डिझेल (ICE), पूर्णपणे इलेक्ट्रिक (EV) आणि हायब्रीड गाड्यांचा समावेश असेल. महिंद्रा आपल्या सध्याच्या लोकप्रिय मॉडेल्सना नवीन लूक आणि हाय-टेक फीचर्ससह अपडेट करत आहे.
26
महिंद्रा स्कॉर्पिओ-एन फेसलिफ्ट (Scorpio-N Facelift)
भारतात प्रचंड लोकप्रिय असलेली ही 7-सीटर SUV आता अधिक दमदार होणार आहे. यात नवीन फ्रंट ग्रिल, एलईडी हेडलॅम्प आणि नवीन अलॉय व्हील्स असतील. गाडीच्या आत 10.25-इंचाची टचस्क्रीन, पॅनोरॅमिक सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा आणि लेव्हल 2 ADAS सुरक्षा प्रणाली असेल. 2.0L पेट्रोल आणि 2.2L डिझेल इंजिन असलेली ही गाडी ऑगस्टच्या सुमारास लाँच होईल.
36
स्कॉर्पिओ क्लासिक फेसलिफ्ट (Scorpio Classic Facelift)
स्कॉर्पिओ क्लासिकलाही अपडेट केलं जात आहे. यात नवीन ग्रिल, बंपर आणि मोठी इन्फोटेनमेंट सिस्टीम असेल. गाडीत 2.2-लिटर mHawk डिझेल इंजिन आणि मॅन्युअल गिअरबॉक्स कायम राहील.
46
थार 3-डोअर फेसलिफ्ट (Thar 3-Door Facelift)
ऑफ-रोड प्रेमींची आवडती थार 3-डोअर आता 'थार रॉक्स' (Thar ROXX) मॉडेलपासून प्रेरित C-आकाराचे एलईडी हेडलॅम्प, एलईडी डीआरएल आणि नवीन बंपरसह येणार आहे. 'थार रॉक्स' मध्ये 1.5-लिटर डिझेल इंजिन वापरून महिंद्रा कमी किंमतीत 5-डोअर थार देण्याची योजना आखत आहे, ज्यामुळे बजेट ग्राहकांसाठी हा एक उत्तम पर्याय ठरेल.
56
महिंद्रा व्हिजन एस (Vision S)
ही गाडी स्कॉर्पिओ-एन पेक्षा खालच्या सेगमेंटमध्ये असेल. हिची रचना फोर्ड ब्रॉन्को आणि लँड रोव्हर डिफेंडरसारखी बॉक्सी असेल. पेट्रोल, डिझेल, हायब्रीड आणि इलेक्ट्रिक पर्यायांमध्ये उपलब्ध होणारी ही गाडी टाटा सिएरा आणि ह्युंदाई क्रेटाला टक्कर देईल. यासोबतच, XUV 3XO च्या जागी 'व्हिजन एक्स' (Vision X), एक लाइफस्टाइल SUV 'व्हिजन टी' (Vision T) (2027-28 पर्यंत) आणि टोयोटा हिलक्सला टक्कर देण्यासाठी 'व्हिजन एसएक्सटी' (Vision SXT) पिकअप ट्रक (2027-28 पर्यंत) देखील येणार आहेत.
66
इलेक्ट्रिक गाड्या
कंपनीच्या 'बॉर्न इलेक्ट्रिक' (BE) सीरिजमधील 'BE 07' गाडीची रोड टेस्टिंग सुरू झाली आहे. INGLO आर्किटेक्चरवर आधारित या गाडीत 59 kWh ते 79 kWh क्षमतेची बॅटरी असेल आणि ती एका चार्जमध्ये 500 किमीची रेंज देईल. ही गाडी ह्युंदाई क्रेटा ईव्ही आणि टाटा हॅरियर ईव्हीला स्पर्धा देईल. याशिवाय, बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक थार 'Thar.e' 2028 पर्यंत लाँच होण्याची शक्यता आहे. कंपनी बोलेरो आणि बोलेरो निओची नेक्स्ट-जनरेशन मॉडेल्सही नवीन प्लॅटफॉर्मवर आणणार आहे.
Read more Photos on

Recommended Stories