Car Market: फेब्रुवारी महिन्यात ह्युंदाईने भारतीय बाजारात रेकॉर्डब्रेक विक्री केली आहे. कंपनीने 12.6% वार्षिक वाढ नोंदवली असून, 2030 पर्यंत 26 नवीन मॉडेल्स लाँच करण्याची योजना आखली आहे. याबद्दल जाणून घेऊयात अधिक…
भारतीय ग्राहकांमध्ये ह्युंदाईच्या गाड्या खूप लोकप्रिय आहेत. विशेषतः क्रेटा आणि वेन्यू सारख्या एसयूव्ही गाड्यांना मोठी पसंती मिळते. गेल्या महिन्यात, म्हणजेच फेब्रुवारीमध्ये ह्युंदाईची कार विक्री जबरदस्त होती.
28
12.6 टक्क्यांची वाढ
गेल्या महिन्यात ह्युंदाईने एकूण 66,134 गाड्या विकल्या. या काळात कंपनीच्या कार विक्रीत वार्षिक 12.6 टक्क्यांची वाढ झाली. फेब्रुवारी महिन्यातील ह्युंदाईची भारतातील ही आतापर्यंतची सर्वाधिक विक्री होती. यापैकी सुमारे 52,407 गाड्या भारतात विकल्या गेल्या, तर 13,727 गाड्या परदेशात निर्यात करण्यात आल्या.
38
कंपनीने काय म्हटलं?
या मोठ्या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना ह्युंदाई इंडियाचे एमडी आणि सीईओ तरुण गर्ग म्हणाले, '2026 ची सुरुवात आमच्यासाठी धमाकेदार झाली. जानेवारीत आतापर्यंतची सर्वाधिक विक्री केल्यानंतर, फेब्रुवारीमध्येही तोच वेग कायम आहे.'
ते पुढे म्हणाले, 'आम्ही भारतात 30 वर्षांच्या जवळ पोहोचत आहोत. आमचं ध्येय स्पष्ट आहे: प्रत्येक ग्राहकापर्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञान पोहोचवणं. ह्युंदाईचा उद्देश फक्त गाड्या विकणं नाही, तर ग्राहकांसाठी ड्रायव्हिंगचा अनुभव अधिक चांगला करणं आहे.'
58
स्थान आणखी मजबूत करणार
ह्युंदाई फक्त आजच्या यशावरच नाही, तर भविष्यावरही लक्ष केंद्रित करत आहे. कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपलं स्थान आणखी मजबूत करण्याचे संकेत दिले आहेत. नुकतंच, नव्या जनरेशनच्या वेन्यूच्या लाँचिंगवेळी कंपनीने एक मोठा खुलासा केला.
68
26 नवीन मॉडेल्स येणार
ह्युंदाईने 2030 पर्यंत भारतात 26 नवीन मॉडेल्स लाँच करण्याची योजना आखली आहे. या मोठ्या मिशनमधील नवीन वेन्यू ही पहिली कार आहे. येत्या काही वर्षांत, आपल्याला रस्त्यावर एकापाठोपाठ एक अनेक नवीन मॉडेल्स दिसतील. या मोठ्या नियोजनाद्वारे, ह्युंदाईला आपला बाजारातील हिस्सा अधिक वेगाने वाढवायचा आहे.
78
बाजारात तगडी स्पर्धा
बाजारातील तीव्र स्पर्धा पाहता ह्युंदाईची कामगिरी महत्त्वाची ठरते. जानेवारीत कंपनीने 11.5% वाढीसह एकूण 73,137 गाड्या विकल्या होत्या. सलग दोन महिन्यांच्या विक्रमी विक्रीच्या आकडेवारीवरून भारतीय ग्राहकांमध्ये ह्युंदाईच्या फीचर्स आणि नवीन तंत्रज्ञानाची मोठी मागणी असल्याचं सिद्ध होतं.
88
भविष्यातील वाटचाल
येत्या काही महिन्यांत कंपनी ही वाढ किती काळ टिकवून ठेवते आणि बाजारात येणाऱ्या 26 नवीन गाड्या कशी कामगिरी करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .