Car Market: मारुती सुझुकी जून 2026 पासून आपल्या सर्व कारच्या किमती वाढवणार आहे. जी कार आज तुमच्या बजेटमध्ये आहे, ती पुढच्या महिन्यात तुमच्या आवाक्याबाहेर जाऊ शकते. अशा परिस्थितीत, 30 हजार रुपये पगार असणाऱ्यांसाठी मारुतीची कोणती कार सर्वोत्तम आहे?
कमी बजेटमध्ये SUV फील तुम्हाला कमी पैशात थोडी उंच आणि दमदार दिसणारी गाडी हवी असेल, तर एस-प्रेसो एक उत्तम पर्याय आहे. हिचा ग्राउंड क्लिअरन्स चांगला असल्यामुळे खराब रस्ते आणि खड्डे सहज पार करते. गाडीची एक्स-शोरूम किंमत ₹3.50 लाख ते ₹5.25 लाखांच्या दरम्यान आहे. ही कार पेट्रोलवर 21.4 किमी/लिटर आणि सीएनजीवर 32.7 किमी/किलो मायलेज देते. तुम्ही साधारण ₹1 लाखांचं डाउनपेमेंट केल्यास, तुमचा मासिक हप्ता (EMI) सुमारे ₹5,500 ते ₹6,500 पर्यंत येईल, जो ₹30,000 पगारात आरामात मॅनेज होऊ शकतो.
25
Maruti Suzuki Alto K10
विश्वासाचं दुसरं नाव ऑल्टो ही भारतातील मध्यमवर्गीयांची सर्वात आवडती गाडी राहिली आहे. नवीन K10 मध्ये तुम्हाला अधिक जागा, उत्तम लूक आणि दमदार इंजिन मिळतं. शहरातील ट्रॅफिक आणि अरुंद गल्ल्यांसाठी ही गाडी सर्वोत्तम आहे. हिची एक्स-शोरूम किंमत ₹3.70 लाख ते ₹5.45 लाखांच्या दरम्यान आहे. ही गाडी पेट्रोलवर 24.4 किमी/लिटर आणि सीएनजीवर 33.9 किमी/किलो मायलेज देते. याच्या बेस मॉडेलसाठी तुम्हाला दरमहा फक्त ₹6,000 च्या आसपास हप्ता भरावा लागेल. हिचा मेंटेनन्स खर्चही खूप कमी आहे, त्यामुळे तुमच्या खिशावर अजिबात भार पडत नाही.
35
Maruti Suzuki Celerio
मायलेजची क्वीन तुमचं रोजचं फिरणं जास्त असेल आणि तुम्हाला पेट्रोलच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर करणारी कार हवी असेल, तर सेलेरियो तुमच्यासाठीच आहे. हिची केबिन खूप मॉडर्न आहे आणि दिसायलाही ती खूप आकर्षक आहे. गाडीची एक्स-शोरूम किंमत ₹4.70 लाख ते ₹6.73 लाखांच्या दरम्यान आहे. ही पेट्रोलवर 25.0 किमी/लिटर आणि सीएनजीवर 34.4 किमी/किलो धावते. याच्या सुरुवातीच्या व्हेरिएंटसाठी तुमचा मासिक हप्ता ₹7,500 च्या आसपास येऊ शकतो. तुम्ही ₹30,000 पगारात थोडा हात आखडता घेतला, तर ही एक चांगली डील ठरू शकते.
संपूर्ण कुटुंबासाठी ऑल-राऊंडर कार लोक वॅगनआरला भारताची 'टॉल-बॉय' कार म्हणतात. यात बसल्यावर तुम्हाला डोक्यावर (हेडरूम) आणि पायाजवळ (लेगरूम) इतकी जागा मिळते की 5 जणांचं कुटुंब आरामात प्रवास करू शकतं. हिची एक्स-शोरूम किंमत ₹4.99 लाख ते ₹6.84 लाखांच्या दरम्यान आहे. ही पेट्रोलवर 20.5 किमी/लिटर आणि सीएनजीवर 33.5 किमी/किलो मायलेज देते. हिचं बेस व्हेरिएंट घेतल्यास तुमचा मासिक EMI सुमारे ₹7,800 ते ₹8,200 पर्यंत येऊ शकतो. तुमच्या घरात उत्पन्नाचा दुसरा स्रोत असेल, तर तुम्ही डोळे झाकून ही कार निवडू शकता.
55
EMI पगाराच्या 15-20% पेक्षा जास्त नसावा
₹30,000 पगारदारांनी कार घेण्यासाठी काय करावं? फायनान्स तज्ज्ञांच्या मते, तुमचा मासिक पगार जेवढा आहे, त्याच्या 50% पेक्षा जास्त कारची ऑन-रोड किंमत नसावी. पण जर तुम्ही 5 किंवा 7 वर्षांसाठी कर्ज घेत असाल, तर तुमचा मासिक EMI ₹6,000 ते ₹7,500 च्या दरम्यान असावा. जेणेकरून उरलेल्या ₹22,000-₹23,000 मध्ये तुमचा घरखर्च आणि बचत सहज सुरू राहील. तुमचा EMI पगाराच्या 15-20% पेक्षा जास्त नसेल याची काळजी घ्या. डिस्क्लेमर: या लेखात दिलेल्या मारुती सुझुकी कारच्या किमती (एक्स-शोरूम) आणि मायलेजचे आकडे कंपनीच्या अधिकृत माहितीवर आधारित आहेत. तुमच्या शहर, राज्य, आरटीओ (RTO) नोंदणी आणि विम्याच्या नियमांनुसार ऑन-रोड किमती बदलू शकतात. कर्जाचा मासिक हप्ता तुमच्या डाउनपेमेंट, बँकेचे व्याजदर आणि कर्जाच्या कालावधीवर अवलंबून असतो. कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी, तुमच्या जवळच्या अधिकृत डीलरकडून प्रत्यक्ष किमती आणि ऑफर्सची खात्री करून घ्या.