BSNL दिवाळी धमाका ऑफर: १९९९ प्लानवर १०० रुपयांची सूट!

बीएसएनएलने दिवाळीनिमित्त १९९९ रुपयांच्या प्लानवर १०० रुपयांची सूट जाहीर केली आहे. ही ऑफर २८ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०२४ पर्यंत उपलब्ध असेल. या प्लानमध्ये ३६५ दिवसांची वैधता, अनलिमिटेड कॉलिंग, १०० एसएमएस आणि ३६५ जीबी डेटा मिळेल.

नवी दिल्ली: खाजगी टेलिकॉम कंपन्या जसे की रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया दिवाळीनिमित्त ग्राहकांसाठी नवीन ऑफर्स सादर करत आहेत. आता सरकारी कंपनी असलेल्या बीएसएनएलने आपल्या सुपर प्लानवर सूट जाहीर केली आहे. खाजगी कंपन्यांनी दरवाढ केली असली तरी बीएसएनएलने कोणतीही दरवाढ केलेली नाही. तरीही आता ६०० जीबी, ३६५ दिवसांच्या वैधतेवर बीएसएनएलने सूट जाहीर केली असून, ही दिवाळी भेट म्हणून ओळखली जात आहे.

ही सूट ऑफर काही दिवसांपुरतीच मर्यादित आहे. या काळात ग्राहकांना रिचार्ज करून सूट मिळवता येईल. होय, बीएसएनएलने आपल्या १,९९९ रुपयांच्या रिचार्ज प्लानवर १०० रुपयांची सूट दिली आहे. त्यामुळे मर्यादित कालावधीसाठी ही ऑफर १,८९९ रुपयांमध्ये उपलब्ध असेल. २८ ऑक्टोबरपासून सुरू होऊन ७ नोव्हेंबर २०२४ रोजी संपेल. या कालावधीत १०० रुपये कमी किमतीत रिचार्ज करता येईल.

BSNL Rs 1999 (Rs 1899) Plan
बीएसएनएलचा १८९९ रुपयांचा प्लानची वैधता ३६५ दिवसांची आहे. हा प्रीपेड प्लान असून, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग सुविधा देण्यात आली आहे. यासोबतच दररोज १०० मोफत एसएमएस पाठवता येतील. संपूर्ण वर्षासाठी एकूण ३६५ जीबी डेटाही ग्राहकांना मिळेल. बीएसएनएलचा कमी किमतीचा दीर्घकालीन सर्वोत्तम प्लान हा आहे.

Jio 1899 Plan Details
रिलायन्स जिओचा १,८९९ रुपयांमध्ये ३६५ दिवसांऐवजी ३३६ दिवसांची वैधता आहे. या प्लानमध्ये २४ जीबी डेटा, मोफत कॉलिंग आणि ३,६०० एसएमएस पाठवण्याची सुविधा आहे. या रिचार्जसोबत जिओ टीव्ही, जिओ क्लाउड आणि जिओ सिनेमा अ‍ॅप्सचा वापर मोफत मिळेल.

Airtel 1999 Plan Details
एअरटेल ३६५ दिवसांच्या वैधतेचा प्लान १,९९९ रुपयांमध्ये देत आहे. २४ जीबी डेटा असलेल्या या प्लानमध्ये दररोज १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळेल. याशिवाय अपोलो २४/७, विंक म्युझिक, स्पॅम प्रोटेक्शन आणि एक्स्ट्रीम प्लेसह इतर फायदे ग्राहकांना मिळतील.

Vi 1999 Plan Details
व्होडाफोन आयडियाचाही एक वर्षाचा प्लान आहे. प्रीपेड वापरकर्त्यांसाठी हा प्लान आणण्यात आला आहे. या प्लानअंतर्गत ग्राहकांना २४ जीबी डेटा, ३६०० एसएमएस, मोफत कॉलिंगचा लाभ मिळेल.

Share this article