सर्वात कमी किमतीत Flight Ticket बुक करायचंय? मग या ट्रिक्स जाणून घ्या

Published : Jan 01, 2026, 10:09 AM IST

Flight Ticket: विमान प्रवासापूर्वी 'तिकिटाचे दर थोडे कमी असते तर... किती बरं झालं असतं' असा विचार तुम्ही करता का? जर हो, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. विमान तिकीट बुक करताना काही सोप्या युक्त्या वापरून तुम्ही हजारो रुपये वाचवू शकता. 

PREV
17
Incognito Mode मध्ये सर्च करा -

तुम्ही प्रत्येक वेळी फ्लाइट तिकीट शोधता, तेव्हा वेबसाइट्स तुमची हिस्ट्री ट्रॅक करतात आणि किंमत वाढवतात. यावर उपाय म्हणजे Incognito Mode किंवा खासगी ब्राउझरमध्ये सर्च करणे. यामुळे तिकीट दर वाढण्यापासून बचाव होतो.

27
योग्य दिवशी आणि वेळेत बुकिंग करा -

मंगळवार, बुधवार आणि शनिवारी विमानाची तिकीटं सहसा स्वस्त असतात. पहाटे ४ ते ६ आणि रात्री उशिरा बुकिंग केल्यास तुम्हाला स्वस्त तिकीट मिळण्यास मदत होते.

37
Compare Apps चा वापर करा -

विमान तिकीट बुक करताना, आधी Skyscanner आणि Google Flights सारख्या ॲप्सचा वापर करून साईट्सवरील किमतींची तुलना करा. ते एकाच वेळी दर दाखवतात. या आधारावर, सर्वात स्वस्त विमान तिकीट बुक करा.

47
अलर्ट ऑन करा -

स्वस्त तिकिटांसाठी प्राइस अलर्ट चालू करा. तिकीट दर कमी होताच तुम्हाला ईमेल किंवा नोटिफिकेशन मिळेल. यावेळी बुकिंग केल्यास तुमची मोठी बचत होऊ शकते.

57
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान बुकिंगची वेळ -

देशांतर्गत विमान प्रवासासाठी १५ दिवस आधी आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी ३०-४५ दिवस आधी तिकीट बुक करा. उशिरा बुकिंग केल्यास तिकीट महाग मिळतं. हा नियम नेहमी लक्षात ठेवा.

67
कूपन आणि कॅशबॅक ऑफर्स -

Paytm, PhonePe आणि CRED प्लॅटफॉर्मवरून विमान तिकीट बुक करताना अनेक ऑफर्स आणि कॅशबॅक मिळतात, त्यामुळे त्यांचा फायदा घ्यायला विसरू नका. यामुळे तुमच्या तिकिटाची किंमत कमी होण्यास मदत होईल.

77
कमी किमतीच्या एअरलाइन्सना टार्गेट करा -

इंडिगो, अकासा, एअरएशिया किंवा गोएअर यांसारख्या कमी किमतीच्या एअरलाइन्स फुल-सर्व्हिस एअरलाइन्सपेक्षा स्वस्त असतात. तिथे बुकिंग केल्यास स्वस्त तिकीट मिळणं सोपं होतं.

Read more Photos on

Recommended Stories