
मुंबई: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी! मुंबई उच्च न्यायालयात मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीअंतर्गत लघुलेखक (Stenographer) पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदांसाठी 27 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, 10 नोव्हेंबर 2025 पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. या भरतीची संपूर्ण माहिती आणि अर्ज प्रक्रिया मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर bombayhighcourt.nic.in उपलब्ध आहे.
मुंबई उच्च न्यायालयात एकूण 30 लघुलेखक पदांसाठी भरती केली जात आहे.
लघुलेखक (उच्च श्रेणी) – 15 पदे
लघुलेखक (निम्न श्रेणी) – 15 पदे
दोन्हीही पदांसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येईल, आणि निवड प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडणार आहे.
उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर (Graduate) असणे आवश्यक.
उच्च श्रेणी लघुलेखक
शॉर्टहँड – 100 शब्द प्रति मिनिट
इंग्रजी टायपिंग – 40 शब्द प्रति मिनिट
निम्न श्रेणी लघुलेखक
शॉर्टहँड – 80 शब्द प्रति मिनिट
इंग्रजी टायपिंग – 40 शब्द प्रति मिनिट
किमान वय: 21 वर्षे
कमाल वय: 38 वर्षे
आरक्षित प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादेत 5 वर्षांची सवलत लागू आहे.
या भरतीतील दोन्ही पदांसाठी पगार ₹49,100 ते ₹1,77,500 प्रति महिना इतका असेल.
सरकारी नोकरीसोबत स्थिर पगार, भत्ते आणि नोकरीची हमी, त्यामुळे ही भरती अनेकांसाठी स्वप्नपूर्ती ठरणार आहे.
प्रक्रिया तारीख
अर्जाची सुरुवात 27 ऑक्टोबर 2025
अर्जाची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2025 (सायं. 5 वाजेपर्यंत)
अर्ज शुल्क ₹1000 (सर्व उमेदवारांसाठी समान)
परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2025
bombayhighcourt.nic.in या संकेतस्थळावर जा.
मुख्य पृष्ठावर “BHC New Website” या टॅबखाली “Recruitment” पर्याय निवडा.
तिथे तुम्हाला दोन्ही पदांसाठी जाहिरात (PDF), कॅरेक्टर सर्टिफिकेट फॉर्म आणि ऑनलाईन अर्ज लिंक दिसेल.
सर्व अटी नीट वाचून, आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरा आणि परीक्षा शुल्क ऑनलाईन जमा करा.
लघुलेखक (उच्च श्रेणी) आणि लघुलेखक (निम्न श्रेणी) या दोन्ही पदांसाठी स्वतंत्र जाहिराती आहेत.
अर्ज करण्यापूर्वी संबंधित पदाची अधिकृत जाहिरात (PDF) नक्की वाचा.
अपूर्ण अर्ज किंवा चुकीची माहिती दिल्यास अर्ज फेटाळला जाऊ शकतो.
संस्था: मुंबई उच्च न्यायालय
पद: लघुलेखक (उच्च व निम्न श्रेणी)
एकूण पदे: 30
पगार: ₹49,100 – ₹1,77,500
शेवटची तारीख: 10 नोव्हेंबर 2025
वेबसाईट: bombayhighcourt.nic.in