Bombay High Court Bharti 2025 : मुंबई उच्च न्यायालयाने लिपिक, शिपाई, स्टेनोग्राफर, चालक यासह विविध पदांसाठी 2331 जागांची मेगा भरती जाहीर केली. ही भरती मुंबई, नागपूर, औरंगाबाद खंडपीठांसाठी असून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 15 डिसेंबर 2025 पासून सुरू होणारय.
Bombay High Court Bharti 2025 : सरकारी नोकरीची वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! मुंबई उच्च न्यायालयाने मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर केली आहे. मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद या तीनही खंडपीठांसाठी लिपिक, शिपाई, स्टेनोग्राफर, चालक आणि अन्य पदांसाठी एकूण 2331 जागांची भरती होणार आहे. उच्च न्यायालयाकडून अधिकृत अधिसूचनेलाही मान्यता देण्यात आली असून अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.