तुम्ही तुमच्या फोनचा ब्लूटूथ नेहमी चालू ठेवता का? तसं असेल तर तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. ब्लूटूथ सतत ऑन ठेवल्याने काय धोके होऊ शकतात, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या चुकीमुळे तुमचं बँक खातंही रिकामं होऊ शकतं, त्यामुळे वेळीच सावध व्हा.
तुम्ही इअरबड्स, स्मार्टवॉच किंवा इतर डिव्हाइस वापरल्यानंतर ब्लूटूथ बंद करत नसाल, तर तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता. तुमचा हा छोटासा निष्काळजीपणा सायबर गुन्हेगारांसाठी एक संधी ठरू शकतो.
27
सायबर हल्ले कसे होतात?
या हल्ल्यात, हॅकर्स ब्लूटूथ कनेक्शन वापरून तुमच्या मोबाईलमध्ये प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करतात. यालाच 'ब्लूबगिंग' (BlueBugging) सायबर अटॅक म्हणतात. फोनचा ब्लूटूथ बराच वेळ चालू असेल आणि इतरांना दिसत असेल, तर हॅकर्स त्याला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करू शकतात.
37
फोनमधील डेटा देखील लीक होऊ शकतो.
जर हॅकर्सनी ब्लूटूथद्वारे तुमच्या फोनशी संपर्क साधला, तर ते तुमचे कॉल्स, मेसेजेस आणि इतर महत्त्वाचा डेटा मिळवू शकतात. त्यामुळे, ब्लूटूथबाबत केलेला छोटासा निष्काळजीपणा तुमच्या डिजिटल सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतो.
जे लोक इअरबड्स, स्मार्टवॉच, ब्लूटूथ स्पीकर वापरतात किंवा कारला फोन कनेक्ट करतात आणि नंतर ब्लूटूथ बंद करत नाहीत, त्यांना सर्वाधिक धोका असतो. रेल्वे स्टेशन, विमानतळ, मॉल्स, कॅफे आणि इतर गर्दीच्या ठिकाणी हा धोका विशेषतः जास्त असतो.
57
या सेटिंग्जमुळे सुरक्षित रहा
तुमचं ब्लूटूथ वापरून झाल्यावर लगेच ते बंद करा. जर तुम्हाला ब्लूटूथ चालू ठेवायचंच असेल, तर ब्लूटूथ व्हिजिबिलिटी (Bluetooth Visibility) बंद करा. यामुळे तुमचा फोन जवळच्या अनोळखी डिव्हाइसेसना दिसणार नाही.
67
छोटीशी खबरदारी, मोठी सुरक्षा
फक्त एक सवय बदलून तुम्ही 'ब्लूबगिंग'सारख्या सायबर धोक्यांपासून स्वतःला सुरक्षित ठेवू शकता. गरज असेल तेव्हाच ब्लूटूथ चालू करा आणि काम झाल्यावर ते बंद करा. ही साधी गोष्ट तुम्हाला मोठ्या नुकसानीपासून वाचवेल.
77
ब्लूटूथ बंद करणे का महत्त्वाचे आहे?
आजकाल स्मार्टफोनमध्ये बँकिंग ॲप्स, खासगी चॅट्स, फोटो आणि अनेक महत्त्वाची कागदपत्रं असतात. एक छोटीशी चूकसुद्धा तुमचा महत्त्वाचा डेटा लीक करू शकते. इतकंच नाही, तर तुमचं बँक खातंही रिकामं होऊ शकतं.