Birth month travel places 2026 : निवडा ठिकाण अन् नव्या पद्धतीने करा ट्रिप प्लॅन

Published : Dec 29, 2025, 06:32 PM IST
Birth month travel places 2026

सार

Birth Month Travel Places 2026 : वाढदिवस असलेल्या महिन्यात पर्यटनाची बेत आखत आहात? तुमच्या जन्म महिन्यानुसार डेस्टिनेशन निवडा आणि हवामान, बजेट आणि अनुभवाचा पुरेपूर फायदा घ्या. जाणून घ्या जानेवारी ते डिसेंबरपर्यंत फिरण्यासाठी 12 सर्वोत्तम ठिकाणे.

Birth Month Travel Places 2026 : हिवाळा म्हटले की पर्यटन. दिवाळीच्या आसपासच डिसेंबर आणि जानेवारीच्या पर्यटनाचे बेत आखले जातात. त्यामुळे देशभरातील प्रमुख पर्यटनस्थळे गर्दींनी ओसंडून वाहतात. पण सध्या वाढदिवस देखील अशाच एखाद्या रम्य पर्यटन स्थळी जाऊन साजरा करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. मात्र, ऋतूनुसार यांची निवड करावी लागते. मग अशावेळी कुटुंबीयांसोबत बर्थडे सेलिब्रेशनचा आनंद लुटता येत नाही. कारण हा क्षण स्मरणीय होणे आवश्यक आहे. 

प्रत्येक महिन्याचे हवामान, गर्दी आणि अनुभव वेगवेगळा असतो. जर तुम्ही 2026 मध्ये स्मार्ट प्रवास करू इच्छित असाल, तर तुमच्या जन्म महिन्यानुसार डेस्टिनेशन निवडू शकता, जो एक उत्तम मार्ग आहे. यामुळे केवळ अनुकूल हवामानच नाही, तर बजेट, फोटोग्राफी आणि अनुभवही शानदार मिळतो. चला जाणून घेऊया की येत्या 2026 मध्ये जन्म महिन्यानुसार फिरण्यासाठी 12 सर्वोत्तम ठिकाणे कोणती आहेत.

जानेवारी- कच्छचे रण, गुजरात

हिवाळ्यातील सर्वात सुंदर काळ. रण उत्सव, पांढरे वाळवंट आणि लोकसंस्कृती उत्सव जानेवारीमध्ये शिखरावर असते. वाढदिवस साजरा करायचा असेल तर क्लबमध्ये नाही, तर इथे जा.

फेब्रुवारी- जैसलमेर, राजस्थान

डेझर्ट सफारी, गोल्डन फोर्ट आणि स्थानिक उत्सव फेब्रुवारीला परिपूर्ण बनवतात. ज्यांचा वाढदिवस फेब्रुवारीमध्ये आहे, त्यांनी जैसलमेरला जावे.

मार्च- वाराणसी, उत्तर प्रदेश

होळीचे रंग, गंगा आरती आणि आध्यात्मिक वातावरण, मार्चमध्ये काशीचा अनुभव अनोखा असतो.

एप्रिल- ऊटी, तामिळनाडू

उन्हाळ्याच्या सुरुवातीला थंड वारे, चहाचे मळे आणि फ्लॉवर शोचा आनंद घ्या. येथे उन्हाळा कमी जाणवेल.

मे- तवांग, अरुणाचल प्रदेश

गर्दी कमी, बर्फाच्छादित दृश्ये आणि शांतता हवी असेल, तर मे महिन्यात तवांगला फिरायला जा. तवांगला भेट देण्यासाठी मे महिना सर्वोत्तम आहे.

जून- लडाख

ॲडव्हेंचर प्रेमींसाठी जूनमधील रोड ट्रिप, मठ आणि निळी सरोवरे वाढदिवस अविस्मरणीय बनवतात.

जुलै- महाबळेश्वर, महाराष्ट्र

पावसाळ्यातील हिरवळ, धबधबे आणि स्ट्रॉबेरी हिल्स जुलै महिन्याला खास बनवतात.

ऑगस्ट- कोडाईकनाल, तामिळनाडू

धुक्यात हरवलेल्या दऱ्या आणि थंड हवामान ऑगस्टमध्ये रोमँटिक अनुभव देतं.

सप्टेंबर- स्पिती व्हॅली, हिमाचल प्रदेश

पावसाळ्यानंतर स्वच्छ आकाश आणि पर्यटकांची कमी गर्दी हवी असेल, तर सप्टेंबर महिना स्पिती व्हॅलीसाठी योग्य आहे.

ऑक्टोबर- हम्पी, कर्नाटक

इतिहास, वारसा आणि आल्हाददायक हवामान, ऑक्टोबरमध्ये हम्पीचा फेरफटका मारा.

नोव्हेंबर- उदयपूर, राजस्थान

लेक सिटीचे सौंदर्य आणि वेडिंग सीझनची धूम नोव्हेंबरमध्ये शिगेला पोहोचलेली असते.

डिसेंबर- गोवा

नवीन वर्षाची पार्टी, बीच आणि कार्निव्हल - डिसेंबरमध्ये गोवा, गोकर्ण, विशाखापट्टणम नेहमीच सर्वोत्तम पर्याय ठरतात.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Health Tips : चेहरा उजळविण्यासाठी काय करायचे? घरच्या घरी करता येतील हे सोपे उपाय
2025 मध्ये भारतीयांनी गुगलवर सर्वाधिक शोधलेले 25 प्रश्न! जाणून घ्या