Bike Market: 72km मायलेज, जबरदस्त फीचर्स; हिरोच्या नव्या बाईकची किंमत बजेटमध्ये!

Published : May 28, 2026, 09:50 PM IST

Bike Market: हिरो कंपनीने आपली नवी सुपर स्प्लेंडर XTEC 2.0 बाजारात आणली आहे. ही बाईक तब्बल 72 किमी प्रति लिटर मायलेज देते. यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसारखे भन्नाट फीचर्स आहेत. या बाईकची किंमत आणि इतर माहिती सविस्तर जाणून घेऊया.

PREV
15
ड्युअल-टोन ग्राफिक्सने लूक झालाय भारी!
हिरोने यावेळी बाईकच्या डिझाइनवर खास मेहनत घेतली आहे. जुन्या मॉडेलच्या तुलनेत यात आकर्षक ड्युअल-टोन ग्राफिक्स, स्टायलिश 3D लोगो आणि स्पोर्टी रिम टेप्स दिले आहेत. यामुळे बाईकला एक प्रीमियम आणि दमदार लूक मिळाला आहे. लांबच्या प्रवासात आराम मिळावा यासाठी 'ड्युअल-टेक्स्चर स्टिच्ड सीट' बसवली आहे.
25
मायलेज ऐकून थक्क व्हाल, लिटरला 72 किमी!
आजकाल बाईक घेताना प्रत्येकजण आधी मायलेज विचारतो. या बाबतीत सुपर स्प्लेंडर XTEC 2.0 एकदम 'किंग' आहे. यात 124.7 सीसी क्षमतेचं सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन आहे, जे 10.7 bhp पॉवर आणि 10.6 Nm टॉर्क निर्माण करतं. कंपनीचा दावा आहे की, ॲडव्हान्स्ड प्रोग्राम्ड फ्युएल इंजेक्शन (APFI) आणि i3S (आयडल स्टॉप-स्टार्ट) सिस्टिममुळे ही बाईक लिटरला तब्बल 72 किलोमीटर मायलेज देते.
35
फुल्ली डिजिटल स्क्रीन, आता बाईकवरच मिळतील अलर्ट्स
टेक्नॉलॉजीच्या बाबतीत ही बाईक नेक्स्ट लेव्हल आहे. यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह फुल्ली डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिलं आहे. त्यामुळे प्रवासात तुमच्या फोनवर येणारे कॉल्स, एसएमएस आणि मिस्ड कॉल अलर्ट्स थेट बाईकच्या स्क्रीनवर दिसतात. इतकंच नाही, तर फोनची बॅटरी किती आहे हेही समजतं. सोबतच रिअल-टाइम मायलेज इंडिकेटर आणि USB टाइप-सी चार्जिंग पोर्टही दिला आहे.
45
सेफ्टी फर्स्ट! हझार्ड लाइट्ससह नवी सुरक्षा
हिरो मोटोकॉर्पने रायडरच्या सुरक्षेसाठी यात जबरदस्त अपडेट्स दिले आहेत. सुपर स्प्लेंडर सिरीजमध्ये पहिल्यांदाच हझार्ड लाइट्स दिले आहेत. दाट धुक्यात किंवा पावसात हे लाइट्स खूप उपयोगी पडतात. चांगल्या ब्रेकिंगसाठी पुढच्या चाकाला डिस्क ब्रेक आणि हँडलबारवर इंजिन किल स्विच दिला आहे. आरामदायी प्रवासासाठी पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक सस्पेन्शन आहे.
55
तुमच्या आवडत्या रंगात निवडा नवी हिरो बाईक
ही नवी बाईक एकूण पाच आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. यात ग्लॉसी ब्लॅक, कँडी ब्लेझिंग रेड, मॅट ॲक्सिस ग्रे, मॅट नेक्सस ब्लू आणि मॅट चेस्टनट ब्राऊन या रंगांचा समावेश आहे. देशभरातील हिरो मोटोकॉर्पच्या शोरूममध्ये ही नवी XTEC 2.0 बाईक विक्रीसाठी तयार आहे. स्टाईल, मायलेज आणि कमी बजेटमध्ये चांगली बाईक शोधणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Photos on

Recommended Stories