
घर कितीही भारी असलं, तरी त्यात झाडं नसतील तर मजा नाही. हल्ली होम गार्डनिंग आणि इनडोअर प्लांट्सचा ट्रेंड जोरात आहे. पण अनेकांना झाडं आणल्यावर त्यांची काळजी घ्यायला वेळ मिळत नाही. मग काय बागकामाचा नाद सोडून द्यायचा? अजिबात नाही! आम्ही तुम्हाला अशा काही फुलझाडांबद्दल सांगणार आहोत, ज्यांना खूप कमी पाणी आणि देखभाल लागते. ही झाडं तुमच्या घराला एक व्हायब्रंट लुक देतील आणि त्याची सुंदरताही वाढवतील. चला तर मग पाहूया यादी.
तुम्हाला कमी मेहनतीत भरपूर फुलं हवी असतील तर बोगनवेलिया (Bougainvillea) लावा. याची एक खासियत आहे, या झाडाला जास्त पाणी दिलं की फुलं कमी येतात. उलट, कोरड्या आणि हलक्या मातीत हे झाड फुलांनी बहरून जातं.
हे झाड बहुतेक करून वाळवंटी भागात वाढतं. याला डेझर्ट रोझ (Desert Rose) असंही म्हणतात. याच्या जाड खोडात अनेक दिवसांचं पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असते. त्यामुळे याला सारखं पाणी द्यायची गरज पडत नाही.
गुलाबी, पांढरा, जांभळा आणि लॅव्हेंडर रंगात येणारी सदाफुली (Venica Plant) वर्षाचे ३६५ दिवस फुलं देते. कडक उन्हाळा असो किंवा थंडीत पडणारं दव, तरीही हे झाड खराब होत नाही.
भारतीय घरांमध्ये कण्हेरीचं झाड सहज दिसतं. हे झाड धूळ, ऊन आणि कोरडं हवामान सहज सहन करतं. याची पिवळी, लाल आणि गुलाबी फुलं घराची सुंदरता वाढवतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कण्हेर विषारी असतं, त्यामुळे लहान मुलं आणि पाळीव प्राण्यांपासून ते दूर ठेवा.
उन्हामुळे झाडं जळतात असं आपण नेहमी ऐकतो, पण या झाडाचं तसं नाही. पिवळीधम्मक फुलं देणारं हे झाड कडक उन्हात छान वाढतं. एकदा लावलं की याला खूप कमी पाण्याची गरज लागते.
तुमची बाल्कनी सुनीसुनी वाटत असेल, तर गझानिया लावा. हे एक युनिक झाड आहे, जे कमी देखभालीतही टवटवीत राहतं. याची फुलं सूर्य उगवल्यावर उमलतात आणि संध्याकाळी आपोआप मिटतात.
तुम्हाला सारखी-सारखी रोपं लावणं, बियाणं पेरणं या कटकटीतून सुटका हवी असेल, तर कॉसमॉस आणि गेलार्डिया हे उत्तम पर्याय आहेत. ही झाडं कोणत्याही खताशिवाय साध्या मातीतही वाढतात. एकदा झाड मोठं झालं की, त्याच्या फुलांच्या बियांमधून नवीन रोपं आपोआप उगवतात.
तुमची झाडं प्रत्येक ऋतूत निरोगी राहावीत असं वाटत असेल, तर मातीचं योग्य मिश्रण खूप महत्त्वाचं आहे. यासाठी खालील गोष्टी वापरा:
हे मिश्रण झाडांची मुळं सडण्यापासून वाचवतं.