फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये स्मार्टफोन्सवर सध्या जबरदस्त ऑफर्स सुरू आहेत. 'एआय प्लस' (AI Plus) कंपनीचे स्मार्टफोन्स आणि टॅबलेट्स तुम्ही अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता. विशेष म्हणजे फक्त 8,999 रुपयांमध्ये 5G फोन मिळतोय.
सध्या मार्केटमध्ये स्मार्टफोन्सच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. पण काही फोन्स कमी बजेटमध्येही उत्तम फीचर्स देतात. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये सध्या अशाच भारी ऑफर्स लाईव्ह आहेत. 'एआय प्लस' (AI Plus) या स्वदेशी कंपनीने त्यांच्या स्मार्टफोन्स आणि टॅबलेट्सवर मोठी सूट जाहीर केली आहे. या फेस्टिव्हल सेलमध्ये तुम्ही अगदी कमी किमतीत बेस्ट फोन्स खरेदी करू शकता.
25
9,000 रुपयांच्या आत बेस्ट फोन ऑप्शन्स
तुमचं बजेट 9,000 रुपयांपेक्षा कमी आहे का? तर मग 'एआय प्लस पल्स 2 एफई' (Pulse 2 FE) हा फोन तुमच्यासाठी बेस्ट चॉईस आहे. फेस्टिव्हल ऑफरमध्ये तुम्ही हा फोन फक्त 8,999 रुपयांना घरी आणू शकता. कंपनीने यात 50MP रिअर कॅमेरा आणि MediaTek Helio G81 प्रोसेसर दिला आहे. रोजच्या वापरासाठी आणि सोशल मीडियासाठी हा फोन एकदम परफेक्ट आहे.
याच किमतीत 'एआय प्लस पल्स 2' (Pulse 2) सुद्धा उपलब्ध आहे. याची किंमतही 8,999 रुपयेच आहे. यात 6,000mAh ची मोठी बॅटरी आणि 50MP AI कॅमेरा मिळतो. पल्स 2 एफई मध्ये 5,000mAh बॅटरी मिळते, तर पल्स 2 मध्ये 6,000mAh बॅटरी दिली आहे. ज्यांना जास्त बॅटरी बॅकअप हवाय, त्यांच्यासाठी पल्स 2 हा एक सुपर ऑप्शन आहे.
35
12,000 रुपयांच्या बजेटमधील जबरदस्त 5G फोन्स
तुमचं बजेट 12,000 रुपयांपर्यंत असेल आणि तुम्हाला एक चांगला 5G फोन घ्यायचा असेल, तर 'एआय प्लस नोव्हा 2 5G' (Nova 2 5G) हा एक उत्तम पर्याय आहे. सेलमध्ये याची किंमत 11,999 रुपये आहे. यात 6,000mAh बॅटरी, 50MP AI कॅमेरा आणि ड्युअल 5G सपोर्ट मिळतो. ज्यांचं बजेट थोडं जास्त आहे, त्यांच्यासाठी 'एआय प्लस नोव्हा 2 निओ 5G' (Nova 2 Neo 5G) हा फोन आहे. याची किंमत 12,999 रुपये आहे. कंपनीने यात MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर आणि Sony IMX 582 कॅमेरा सेन्सर दिला आहे. फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी हा फोन एकदम भारी आहे.
45
अभ्यास आणि कामासाठी बेस्ट टॅबलेट्स
फक्त स्मार्टफोन्सच नाही, तर मोठ्या स्क्रीनवर अभ्यास करण्यासाठी आणि व्हिडिओ पाहण्यासाठी 'एआय प्लस'ने स्वस्तात टॅबलेट्सही आणले आहेत. 'एआय प्लस नोव्हा टॅब 5G' (NovaTab 5G) ची किंमत 21,999 रुपये आहे. यात 11.97 इंचांचा डिस्प्ले, 8,000mAh बॅटरी आणि 13MP मेन कॅमेरा मिळतो. तसेच, 'एआय प्लस पल्स टॅब' (PulseTab) ची किंमत 12,999 रुपये आहे. यात 10.95 इंचांचा फुल एचडी डिस्प्ले, 8,000mAh बॅटरी आणि चार स्पीकर्स दिले आहेत. ऑनलाईन क्लासेस आणि व्हिडिओ पाहण्यासाठी कमी बजेटमध्ये हा एक सुपर चॉईस आहे.
55
कोणता फोन खरेदी करणं फायद्याचं ठरेल?
या सेलमध्ये कंपनीने अनेक मॉडेल्स उपलब्ध करून दिले आहेत. 18,999 रुपयांच्या किमतीत 'नोव्हा 2 अल्ट्रा 5G' (Nova 2 Ultra 5G) सुद्धा मिळतोय. याशिवाय 7,000mAh ची जंबो बॅटरी असलेला 'नोव्हा 2 पॉवर 5G' (Nova 2 Power 5G) आणि फोल्डेबल 'नोव्हा फ्लिप 5G' (NovaFlip 5G) हे फोन्सही या रेंजमध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार तुमचा आवडता फोन किंवा टॅबलेट या फ्लिपकार्ट सेलमध्ये सहज खरेदी करू शकता.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .