
Best & Cheap Juicer: उन्हाळा आला की थंडगार ज्यूस प्यावासा वाटतो. पण बाहेरचा ज्यूस आरोग्यासाठी चांगला नसतो आणि घरात महागडा ज्यूसर आणायचा नसतो. अशावेळी काय करायचं? काळजी करू नका, आम्ही तुम्हाला 500 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणाऱ्या पाच बेस्ट फ्रूट आणि व्हेजेटेबल ज्यूसर्सबद्दल सांगणार आहोत. यामध्ये मॅन्युअल, पोर्टेबल आणि इलेक्ट्रिक असे सगळे पर्याय उपलब्ध आहेत.
या प्रकारचा मॅन्युअल फ्रूट ज्यूसर एकदम मजबूत आणि जास्त काळ टिकणारा असतो. हा तुम्हाला Zepto, Meesho सारख्या साईट्सवर 300 ते 400 रुपयांत सहज मिळून जाईल. यामध्ये तुम्ही लिंबू, संत्री, डाळिंब यांचा रस काढू शकता. याचा फायदा म्हणजे फळांचा चोथा बाजूला निघतो आणि तुम्हाला एकदम फ्रेश ज्यूस मिळतो.
आणखी वाचा- Juice Without Juicer: मिक्सर किंवा ज्यूसरशिवाय बनवा फ्रेश ज्यूस, वापरा या 5 सोप्या टिप्स
हा ज्यूसर फक्त फळांचाच नाही, तर भाज्यांचा रसही अगदी सहज काढू शकतो. हा एक मॅन्युअल ज्यूसर आहे, ज्यामध्ये हँडलच्या मदतीने तुम्ही कोणतंही फळ किंवा भाजी टाकून त्याचा रस काढू शकता. कमी बजेटमध्ये हा एक चांगला पर्याय आहे, कारण Amazon किंवा Flipkart च्या सेलमध्ये हा तुम्हाला 200 ते 250 रुपयांमध्ये मिळतो.
जर तुम्हाला फ्रूट ज्यूसरमध्ये इलेक्ट्रिक पर्याय हवा असेल, तर तुम्ही Rore Pro 200 वॉट ज्यूसर मिक्सर ग्राइंडर खरेदी करू शकता. या इलेक्ट्रिक ज्यूसरमध्ये ज्यूस पटकन निघतो आणि तो मिक्सरसारखं काम करतो. म्हणजेच, तुम्ही जास्त मेहनत न करता हेल्दी ज्यूस बनवू शकता. हा ज्यूसर तुम्हाला 500 ते 550 रुपयांमध्ये सहज मिळेल.
आजकाल पोर्टेबल ज्यूसर ब्लेंडरचा ट्रेंड खूप वाढला आहे, जे 400 ते 500 रुपयांत सहज मिळतात. हे USB चार्जिंगवर चालतात, म्हणजे तुम्ही तुमच्या फोनच्या चार्जरला याची केबल लावून ज्यूस बनवू शकता. जिम, ऑफिस किंवा प्रवासासाठी हा एक परफेक्ट पर्याय आहे.
हा ब्लेंडर ज्यूसर USB केबलसोबत येतो. यात ग्लास, प्लास्टिक आणि स्टेनलेस स्टीलचा वापर केलेला असतो. एकदा चार्ज केल्यावर तुम्ही तो बराच वेळ वापरू शकता. यात फ्रूट ज्यूससोबत स्मूदी सुद्धा बनवता येते. Amazon च्या साईटवर हा ज्यूसर 84% डिस्काउंटसह तुम्हाला फक्त 329 रुपयांना मिळेल. यासोबत तुम्हाला एक ग्लास जारही मिळेल.