Beauty Tips: डागविरहित आणि चमकदार चेहरा प्रत्येकालाच हवा असतो. यासाठी अनेकजण महागडी सौंदर्य उत्पादनं विकत घेतात किंवा ब्युटी ट्रीटमेंट्स करतात. पण घरात सहज उपलब्ध असणाऱ्या एका नैसर्गिक घटकाने तुम्ही चेहऱ्यावर चमक आणू शकता.
अनेकजण सोपे घरगुती उपाय सोडून इन्स्टंट ग्लो, पार्लर आणि महागड्या उत्पादनांकडे धाव घेतात. यामुळे अनेकदा त्वचेचं नुकसान होतं. चेहऱ्यावरचे डाग आणि टॅनिंग घालवण्यासाठी महागड्या क्रीम्सची गरज नाही. कच्च्या दुधानेही तुम्ही चमकदार त्वचा मिळवू शकता. हा एक नैसर्गिक उपाय असल्यामुळे तो सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त ठरतो.
24
कच्च्या दुधाचे त्वचेच्या आरोग्यासाठीचे फायदे
कच्च्या दुधामध्ये त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक अनेक पोषक तत्वं असतात. यात असलेलं लॅक्टिक ॲसिड त्वचेवरील मृत पेशी (dead cells) काढून टाकायला मदत करतं. त्यामुळे त्वचा ताजी आणि मऊ दिसते. तसेच, दुधातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात. व्हिटॅमिन ए त्वचेला मॉइश्चराइझ करून चेहऱ्याचा ग्लो वाढवतं, तर प्रोटीन्स त्वचेला घट्ट आणि तरुण ठेवण्यास मदत करतात. म्हणूनच अनेकजण कच्च्या दुधाचा नैसर्गिक स्किन केअर टीप म्हणून वापर करतात.
34
कच्च्या दुधाचा उपाय
जर तुमचा चेहरा खूप कोरडा आणि निस्तेज दिसत असेल, तर कच्चं दूध एक उत्तम उपाय आहे. कच्चं दूध चेहऱ्याला लावल्यास त्वचेला ओलावा मिळतो आणि त्वचा मऊ होते. इतकंच नाही, तर दुधातील लॅक्टिक ॲसिड मृत पेशी काढून चेहरा चमकदार बनवतं. हा उपाय टॅनिंग आणि डाग कमी करण्यासही मदत करतो. त्वचेवरील छोटी-मोठी सूज कमी करून चेहऱ्याला फ्रेश लूक देतो. कच्च्या दुधातील व्हिटॅमिन ए वृद्धत्वाची लक्षणं कमी करण्यासही मदत करतं.
सर्वात आधी चेहरा स्वच्छ धुवा. त्यानंतर दोन चमचे कच्चं दूध घेऊन त्यात थोडं मध मिसळा. हे मिश्रण चेहऱ्याला लावून सुमारे 15 मिनिटं तसंच ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. असं आठवड्यातून दोन ते तीन वेळा केल्यास चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या चमक येईल.