Unlucky Plants: सुंदर दिसणारी ही झाडं घरात आणू शकतात दुर्भाग्य, वेळीच व्हा सावध!

Published : May 03, 2026, 10:37 AM IST
Beautiful But Dangerous Unlucky Plants That Can Bring Bad Luck to Your Home

सार

Unlucky Plants: प्रत्येक झाड काही घरात लावण्यासाठी चांगलं नसतं. काही झाडं दिसायला खूप आकर्षक वाटतात, पण ती तुमच्या आरोग्यासाठी किंवा सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात.

अनेक जण आपापल्या घरी वेगवेगळी झाडांची रोप घेऊन येतात आणि ती झाडं मोठी करतात. मात्र, यामध्ये काही झाडं ही तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे ही झाडे नेमकी कोणती आहेत, याचबाबत आपण आज जाणून घेऊयात. 

ही झाडे आहेत धोकादायक - 

डायफेनबॅकिया (Dieffenbachia) नावाच्या रोपट्याची पानं दिसायला खूप सुंदर असतात. पण त्याचा रस विषारी असतो. जर तो त्वचेला लागला, तर जळजळ, सूज किंवा ॲलर्जी होऊ शकते. ज्या घरात लहान मुलं किंवा पाळीव प्राणी आहेत, तिथे हे झाड लावणं धोकादायक ठरू शकतं.

ओलिएंडर (Oleander) झाडाला खूप सुंदर फुलं येतात, पण त्याची पानं, फुलं आणि खोड सगळंच विषारी असतं. त्याचा छोटासा अंश जरी शरीरात गेला, तरी आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर, अनेक जण शोभेसाठी कॅक्टस (Cactus) लावतात. पण त्याच्या काट्यांमुळे जखम होऊ शकते.

लहान मुलं असलेल्या घरांसाठी हे धोकादायक आहे. त्याचप्रमाणे, चिंच किंवा बाभळीसारखी मोठी झाडं घराच्या जवळ लावू नयेत. कारण ती वेगाने वाढतात आणि घराच्या जागेवर परिणाम करू शकतात. शिवाय, बाभळीच्या झाडाला काटे असतात, जे धोकादायक ठरू शकतात.

याशिवाय, काही झाडांना खूप जास्त काळजी घ्यावी लागते. जर त्यांची योग्य निगा राखली नाही, तर ती सुकतात किंवा त्यांच्यामुळे घरात पसारा होऊ शकतो. याचा परिणाम घरातील वातावरणावर होतो. त्यामुळे, जी झाडं सहज वाढतात, विषारी नाहीत आणि सुरक्षित आहेत, अशीच झाडं निवडणं केव्हाही चांगलं.

थोडक्यात काय, तर घरात झाडं लावणं ही चांगली सवय आहे, पण योग्य झाडांची निवड करणं महत्त्वाचं आहे. आरोग्य, सुरक्षितता आणि देखभालीचा विचार करून झाडं निवडल्यास तुमच्या घरातील वातावरण सुंदर, सुरक्षित आणि शांत राहील.

PREV
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Articles on

Recommended Stories

Kia Assured Buyback: जुनी कार विकण्याचं टेन्शन खल्लास! ३ वर्षानंतर किआ देणार ७५% गॅरंटीड भाव
Yamaha Festive Offer: यामाहाची भन्नाट ऑफर! फक्त २४९९ रुपये भरा आणि घरी आणा नवी कोरी बाईक किंवा स्कूटर