Axis Credit Card : ॲक्सिस बँकेकडून मोठे बदल, 28 ऑगस्टपासून क्रेडिट कार्डसाठी नवे नियम, खिशाला बसणार चाप

Published : Aug 22, 2026, 03:43 PM IST

ॲक्सिस बँकेने (Axis Bank) आपल्या क्रेडिट कार्ड ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. बँकेने क्रेडिट कार्डचे नियम आणि शुल्कांमध्ये महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. हे नवीन नियम 28 ऑगस्ट 2026 पासून लागू होणार आहेत.

PREV
16
ग्राहकांना मोठा भार
तुम्ही ॲक्सिस बँकेचं क्रेडिट कार्ड वापरता का? मग तुमच्यासाठी एक धक्कादायक बातमी आहे. ॲक्सिस बँकेने क्रेडिट कार्डचे नियम अधिक कडक केले असून नवीन शुल्कं लागू केली आहेत. 28 ऑगस्ट 2026 पासून लागू होणारे हे बदल ग्राहकांच्या खिशावर भार टाकणारे ठरू शकतात.
26
उशिरा पेमेंट केल्यास महागडं शुल्क (Late Payment Fees Changed)

जर तुम्ही वेळेवर क्रेडिट कार्ड बिल भरायला विसरलात, तर बँक तुमच्याकडून विलंब शुल्क (Late Fee) आकारते. बँकेने आता या शुल्कात बदल केले आहेत. विशेषतः 50,000 रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असेल तर मोठा दंड भरावा लागेल. विविध थकबाकीच्या रकमांसाठी नवीन शुल्कांची यादी खालीलप्रमाणे आहे: -

  • 500 रुपयांपर्यंत: कोणतेही विलंब शुल्क नाही
  • 501 ते 5,000 रुपयांपर्यंत: 500 रुपये शुल्क
  • 5,001 ते 10,000 रुपयांपर्यंत: 750 रुपये शुल्क
  • 10,001 ते 50,000 रुपयांपर्यंत: 1,200 रुपये शुल्क
  • 50,000 रुपयांपेक्षा जास्त थकबाकीवर: 1,300 रुपये विलंब शुल्क
36
पेमेंट सेटलमेंटचा नवा क्रम (Payment Settlement Priority)
जर तुम्ही बिलाची पूर्ण रक्कम न भरता काही भागच भरला, तर तुमच्या पैशांचा वापर कसा केला जाईल यासाठी बँकेने एक नवीन क्रम ठरवला आहे. तुमची पेमेंटची रक्कम आधी लागू होणारे टॅक्स आणि विविध शुल्कांसाठी (Fees & Charges) वापरली जाईल. त्यानंतर EMI, मग व्याज शुल्क, त्यानंतर सामान्य खरेदी आणि शेवटी कॅश ॲडव्हान्ससाठी (नगदी काढणे) वापरली जाईल.
46
डायनॅमिक करन्सी कन्व्हर्जन (DCC) शुल्कात वाढ

आंतरराष्ट्रीय व्यवहार किंवा परदेशी वेबसाइटवर भारतीय रुपयांमध्ये पेमेंट करताना आकारले जाणारे डायनॅमिक करन्सी कन्व्हर्जन (DCC) मार्कअप शुल्क 1.5 टक्क्यांवरून थेट 3.5 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे. (मात्र, मॅग्नस कार्डसाठी हे शुल्क 2 टक्के असेल). यामुळे परदेशात प्रवास करणाऱ्या किंवा भारतीय चलनात परदेशी पेमेंट करणाऱ्यांचा खर्च वाढणार आहे.

56
एअरपोर्ट लाउंज प्रवेशाचे नियम (Airport Lounge Access Rules)
देशांतर्गत (डोमेस्टिक) एअरपोर्ट लाउंजमध्ये मॅग्नस क्रेडिट कार्डचा 'प्रायॉरिटी पास' (Priority Pass) आता चालणार नाही. डोमेस्टिक लाउंजमध्ये प्रवेश करण्यासाठी ग्राहकांना त्यांचे प्रत्यक्ष कार्ड (Physical Card) आणि बोर्डिंग पास दाखवावा लागेल. इमिग्रेशन प्रक्रियेनंतरच्या भारतीय आंतरराष्ट्रीय टर्मिनल्समधील एअरपोर्ट लाउंज हे आंतरराष्ट्रीय लाउंज म्हणूनच गणले जातील. तिथे प्रायॉरिटी पास वापरून प्रवेश मिळवता येईल.
66
गिफ्ट कार्ड आणि टोल पेमेंटवर रिवॉर्ड्स नाहीत

गिफ्ट कार्ड खरेदीवर आता कोणत्याही प्रकारचे रिवॉर्ड पॉइंट्स किंवा कॅशबॅक मिळणार नाही. या खर्चांना 'वॉलेट' खर्चांच्या विभागातून काढून 'गिफ्ट कार्ड्स' या वेगळ्या विभागात टाकले जाईल. तसंच, टोल पेमेंट, रोड टॅक्स आणि ब्रिज फी भरण्यावरही आता कोणतेही रिवॉर्ड पॉइंट्स दिले जाणार नाहीत. ॲक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्ड ग्राहकांनी हे नवीन बदल लक्षात घेऊन आपली मासिक बिलं वेळेवर भरणं महत्त्वाचं आहे. उशिरा पेमेंट आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारांवरील वाढीव शुल्काचा फटका टाळण्यासाठी आतापासूनच काळजी घ्या.

Read more Photos on

Recommended Stories