ATM Franchise Business A Guide : तुम्हाला घरबसल्या महिन्याला लाखो रुपये कमवायचे आहेत का? तर एटीएम फ्रँचायझीचा व्यवसाय तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. फक्त ५ लाखांच्या गुंतवणुकीत हा व्यवसाय कसा सुरू करायचा, याची सविस्तर माहिती घेऊया.
आजकाल अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत शोधणाऱ्यांसाठी एटीएम फ्रँचायझी हा एक चांगला पर्याय ठरत आहे. बँका स्वतःचं एटीएम नेटवर्क वाढवण्यासाठी थर्ड-पार्टी कंपन्यांना परवानगी देत आहेत. यामुळे सामान्य नागरिकही एटीएम बसवून चांगला नफा कमवू शकतात.
25
किती करावी लागेल गुंतवणूक?
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला साधारणपणे ५ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये सिक्युरिटी डिपॉझिट आणि वर्किंग कॅपिटलचा समावेश असतो.
35
उत्पन्न कसं मिळतं?
एटीएम व्यवसायात तुम्हाला प्रत्येक व्यवहारावर कमिशन मिळतं. एका ट्रान्झॅक्शनमागे साधारणपणे २० रुपये कमिशन मिळतं. तुमच्या एटीएममध्ये दिवसाला ३०० व्यवहार झाले, तर तुम्ही रोज ६,००० रुपये कमवू शकता. या हिशोबाने महिन्याला १.८० लाखांपर्यंत उत्पन्न मिळू शकतं.
महिन्याला वीज बिल, जागेचं भाडं आणि इतर देखभालीसाठी साधारण ३०,००० रुपये खर्च झाला तरी, तुम्हाला दीड लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतो. म्हणजेच, तुम्ही वर्षाला जवळपास १८ लाख रुपये कमवू शकता.
55
या कंपन्या देतात फ्रँचायझी
एटीएम बसवण्यासाठी किमान ६० ते १०० चौरस फूट जागेची गरज असते. ही जागा गर्दीच्या ठिकाणी असेल, तर जास्त व्यवहार होऊन नफा वाढण्याची शक्यता असते. टाटा इंडिकॅश (Tata Indicash), मुथूट एटीएम (Muthoot ATM) आणि इंडिया वन (India1) यांसारख्या कंपन्या फ्रँचायझी देतात. ज्यांना व्यवसायात स्थिर उत्पन्न हवं आहे, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.