Astrology: ज्योतिषशास्त्रात अत्यंत शुभ आणि दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या पुष्य नक्षत्रातून गुरु लवकरच भ्रमण करणार आहे. सध्या कर्क राशीत असलेला गुरु, 18 जून रोजी शनीच्या अधिपत्याखाली असलेल्या पुष्य नक्षत्रात प्रवेश करेल.
18 जून ते 18 ऑगस्टपर्यंत गुरु तुमच्या राशीत पुष्य नक्षत्रात उच्च स्थानी असेल. यामुळे तुम्हाला एकाच वेळी अनेक चांगल्या बातम्या मिळतील. समाजात मान-सन्मान वाढेल. चांगला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आणि नवीन योजनांची कामं पुढे सरकतील. वैवाहिक जीवन सुखी राहील आणि अविवाहितांचे लग्न जमू शकते.
24
धनु रास
गुरुचं पुष्य नक्षत्रातील भ्रमण धनु राशीच्या लोकांसाठी शुभ परिणाम देईल. या नक्षत्र बदलामुळे धनु राशीच्या लोकांना मोठा फायदा होईल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. या काळात धनलाभाची शक्यता आहे आणि अडकलेले पैसे परत मिळू शकतात. गुंतवणुकीसाठी हा काळ खूप चांगला असेल. तुमच्या संधी आणि सुखसोयी वाढतील.
34
कन्या रास
गुरुचं नक्षत्र परिवर्तन तुमच्या राशीतून अकराव्या घरात होईल. या काळात तुम्ही ऐषारामाचं जीवन जगू शकाल. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. उत्पन्नाचे नवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. बऱ्याच काळापासून रखडलेली कामं पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल आणि बढतीचीही शक्यता आहे.
गुरुचं नक्षत्र भ्रमण तुमच्या भाग्य स्थानी म्हणजेच नवव्या घरात होईल. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. अचानक आर्थिक लाभाची शक्यता आहे आणि गुंतवणुकीतून चांगला पैसा कमावण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. परदेशात जाण्याची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते आणि शिक्षण क्षेत्रात मोठं यश मिळू शकतं.