
मायोपिया किंवा निकटदृष्टीदोष असलेल्या लोकांना लांबच्या वस्तू पाहताना धूसर दिसू शकतात. त्यांना जवळच्या वस्तू पाहण्यात कोणतीही अडचण नसते, पण लांबच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत.लहान वयात मुलांमध्ये ही समस्या आढळून येत आहे. मुलांमध्ये मायोपिया वाढण्यास कारणीभूत ठरणाऱ्या सवयी कोणत्या आहेत ते पाहूया.
१. फोन आणि कॉम्प्युटरसमोर तास न् तास घालवणे
अनेक अभ्यासांनुसार, मोबाईल फोन किंवा तत्सम उपकरणांकडे पाहण्यात घालवलेला प्रत्येक तास मुलांमध्ये निकटदृष्टीदोष होण्याचा धोका वाढवतो. डॉक्टरांच्या मते, स्क्रीन टाइममध्ये दररोज एक तासाची वाढ झाल्यास मायोपियाचा धोका २१ टक्क्यांनी वाढतो.
२. फोन खूप जवळ धरून वापरणे
मोबाईल फोन वापरताना तो डोळ्यांच्या अगदी जवळ धरणे देखील डोळ्यांसाठी चांगले नाही.
३. बाहेर खेळायला वेळ न काढणे
नैसर्गिक सूर्यप्रकाशात बाहेर वेळ न घालवल्याने मायोपियाचा धोका वाढतो. स्मार्टफोन, टॅब्लेट आणि कॉम्प्युटर वापरणे किंवा पुस्तके वाचणे यासारख्या जवळच्या कामांमध्ये जास्त वेळ घालवल्याने मायोपिया होऊ शकतो.
४. अभ्यास करताना अंधुक प्रकाश असणे
अंधुक प्रकाशात पुस्तके वाचणे आणि अभ्यास करणे यामुळेही डोळ्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.