iPhone 18 Pro साठी डिझाइन तेच, पण कंपनीने केलेत हे 5 मोठे बदल

Published : Sep 09, 2026, 10:46 AM IST
iPhone 18 Pro Colors Leak

सार

सप्टेंबर 2026 मध्ये लाँच होणाऱ्या आयफोन 18 प्रो चं डिझाइन जुन्या मॉडेलसारखंच असलं तरी, आतून मात्र मोठे बदल होणार आहेत.

मुंबई : Apple कंपनी ९ सप्टेंबर, २०२६ रोजी होणाऱ्या आपल्या ग्लोबल इव्हेंटमध्ये iPhone18 प्रो सादर करण्याची दाट शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, या फोनचं बाहेरून दिसणारं डिझाइन फारसं बदलणार नाही, पण आतले फीचर्स मात्र पूर्णपणे नवीन असतील. या हाय-एंड गॅझेटमध्ये A20 प्रो प्रोसेसर दिला जाईल, जो TSMC च्या अत्याधुनिक 2-नॅनोमीटर टेक्नॉलॉजीवर बनवलेला असेल. या बदलामुळे फोनचा परफॉर्मन्स आधीच्या मॉडेलपेक्षा जवळपास 18% जास्त वेगवान होईल आणि फोन 30% कमी गरम होईल.

आयफोन 18 प्रो मध्ये कॅमेऱ्यात एक मोठा बदल पाहायला मिळू शकतो. यात व्हेरिएबल ॲपर्चर असलेला प्रायमरी कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे. यामुळे युजर्सना DSLR कॅमेऱ्याप्रमाणे लाईट आणि डेप्थ ऑफ फील्डवर जास्त कंट्रोल मिळेल. रिपोर्ट्सनुसार, ॲपल चार वर्षांनंतर प्रो मॉडेल्समधील 'डायनॅमिक आयलंड'चा आकार सुमारे 35% लहान करणार आहे. यासाठी फेस आयडी सेन्सर्सना आतल्या बाजूला हलवून लहान केलं जाईल, ज्यामुळे डिस्प्लेवर अधिक जागा मिळेल.

ॲपल बऱ्याच काळापासून दुसऱ्या कंपन्यांवर अवलंबून आहे, पण आता हे चित्र बदलणार आहे. कंपनी आयफोन 18 प्रो मध्ये स्वतःचं C2 मॉडेम वापरण्याची शक्यता आहे. या कस्टम सिलिकॉनमुळे 5G स्पीड तर वाढेलच, पण बॅटरीची बचतही जास्त होईल.प्रो मॉडेल्समध्ये 12GB रॅम दिली जाऊ शकते, जेणेकरून 'ॲपल इंटेलिजन्स'चे ॲप्स फोनवर सहज चालतील. तसेच, मोठ्या आयफोन 18 प्रो मॅक्स मॉडेलमध्ये 5,567mAh क्षमतेची बॅटरी दिली जाण्याची चर्चा आहे, ज्यामुळे फोन जास्त वेळ वापरता येईल.

या मोठ्या हार्डवेअर बदलांमुळे, विशेषतः 2-नॅनोमीटर चिप आणि मेकॅनिकल कॅमेरा पार्ट्समुळे, फोन बनवण्याचा खर्च लक्षणीय वाढणार आहे. विश्लेषकांच्या मते, ॲपल हा वाढीव खर्च ग्राहकांवर टाकू शकते, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात फोनची सुरुवातीची किंमत वाढू शकते.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Maruti Price Hike : मारुती सुझुकीच्या गाड्या महागणार, किंमतीत होणार ऐवढी वाढ
Remote Repair : रिमोट बंद पडलाय? नवीन विकत घेण्याआधी वापरा या 6 ट्रिक्स