Apple in 2026: दरवर्षीप्रमाणे, 2026 मध्येही ऍपल ब्रँड अनेक नवीन गॅझेट्स बाजारात आणणार आहे. यापैकी काही सध्याच्या उपकरणांच्या अपडेटेड आवृत्त्या असतील. तर आयफोन फोल्डसारखे काही नवीन प्रोडक्ट्स लाँच केले जातील. नेमकी कोणती आहेत ही गॅझेट्स जाणून घेऊयात.
9To5Mac च्या रिपोर्टनुसार, ऍपलच्या 2026 च्या लाइनअपमध्ये OLED मॅकबुक प्रो, नवीन स्टुडिओ डिस्प्ले, होम हब, पहिला फोल्डेबल आयफोन आणि नवीन एन्ट्री-लेव्हल मॅकबुक यांचा समावेश असू शकतो.
26
नवीन स्टुडिओ डिस्प्ले
2026 च्या सुरुवातीला ऍपल एक नवीन मॅक डिस्प्ले सादर करू शकते. नवीन स्टुडिओ डिस्प्ले मॉडेलमध्ये 27-इंचाचा मिनी-एलईडी पॅनल असेल अशी चर्चा आहे. सध्याच्या A13 बायोनिक चिपऐवजी नवीन मॉडेलला A19 प्रो चिप मिळेल.
36
ऍपल होम हब
ऍपल 7-इंचाचा डिस्प्ले, A18 चिप आणि कॅमेरा असलेल्या 'होमपॉड' स्टाईल डिव्हाइसवर काम करत आहे. हे स्मार्ट होम उपकरणांसाठी हब म्हणून काम करेल. यात homeOS इंटरफेस आणि फेसटाइमसारखे फीचर्स असू शकतात.
ऍपलच्या 2026 मॅकबुक प्रोमध्ये मोठे अपडेट्स मिळतील. यात नवीन डिस्प्ले, स्लीम आणि हलकी बॉडी आणि M6 चिप्स असतील. हे 2nm आर्किटेक्चरवर तयार केले जाईल. हा 5G कनेक्टिव्हिटी असलेला ऍपलचा पहिला मॅक असू शकतो.
56
पहिला फोल्डेबल आयफोन
आयफोन फोल्ड सादर करून ऍपल मोठे अपग्रेड करण्याच्या तयारीत आहे. यात बुक-स्टाईल फोल्डेबल डिझाइन, 7.8-इंचाचा आतील आणि 5.5-इंचाचा बाहेरील डिस्प्ले असू शकतो. ऍपल डिस्प्ले क्रीज कमी करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.
66
परवडणाऱ्या किमतीतील मॅकबुक
2026 मध्ये ऍपल एक नवीन एन्ट्री-लेव्हल मॅकबुक सादर करू शकते, जे मॅकबुक एअरपेक्षा स्वस्त असेल. यात 13-इंचाचा डिस्प्ले आणि A18 प्रो चिप असेल. हे आयफोन-क्लास ए-सीरिज चिप वापरणारे पहिले मॅकबुक असेल.