Amazon-Flipkart चा धमाका, 27 सप्टेंबरच्या सेलमध्ये मिळणारे पाहा डिस्काउंट-ऑफर्स

Published : Sep 17, 2024, 11:51 AM ISTUpdated : Sep 17, 2024, 11:53 AM IST
amazon and flipkart sale

सार

Amazon and Flipkart Sale 2024 : अ‍ॅमेझॉनचा वार्षिक सेल ग्रेट इंडियन फेस्टिव्हल आणि फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलची घोषणा करण्यात आली आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, टीव्ही, फ्रिज ते पंख्यासह अन्य काही प्रोडक्ट्सवर धमाकेदार ऑफर मिळणार आहे.

अ‍ॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलची घोषणा करण्यात आली आहे. येत्या 27 सप्टेंबरपासून सेलची सुरुवात होणार असून प्राइम मेंबर्सला याआधीच खरेदी करता येणार आहे. याशिवाय 27 सप्टेंबरला फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेलही लाइव्ह होणार आहे. अशातच ग्राहकांना डबल धमाक्यासह शानदार डिल्स आणि ऑफर्स मिळणार आहेत. एवढेच नव्हे ग्राहकांना अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या सेलमधील प्रोडक्ट्सची एकमेकांसोबत तुलना करुन खरेदीही करता येणार आहे.

 

 

शानदार डिस्काउंट मिळणार
अ‍ॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये एसबीआय (SBI) डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खरेदी केल्यास EMI सोबत 10 टक्के इंस्टंट सूट दिली जाणार आहे. प्राइम ग्राहकांना अ‍ॅमेझॉन पे ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅकचा लाभ घेता येणार आहे. याशिवाय डेबिट आणि क्रेडिट कार्डवर नो-कॉस्ट EMI ची ऑफरही मिळणार आहे.

एक्सचेंज ऑफरमध्ये खरेदी करता येणार प्रोडक्ट्स
ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्ये जुने प्रोडक्ट्स एक्सजेंच करण्याच्या ऑफरचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे. सेलमध्ये टीव्ही, फर्निचर आणि स्मार्टफोनसारख्या प्रोडक्ट्सच्या खरेदीवर डिलिव्हरीच्या वेळी इंस्टॉलेशनची सुविधा दिली जाणार आहे.

49 रुपयांत खरेदी करता येणार प्रोडक्ट्स
ग्रेट इंडियन फेस्टिव्हलदरम्यान 8 रुपयांपासून सुरु होणाऱ्या किंमतीत आकर्षक प्रोडक्ट्सची खरेदी करता येणार आहे. याशिवाय 49 रुपयांपासून सुरु होणाऱ्या डेली डीलचाही लाभ घेता येणार आहे. मोफत डिलिव्हरी, कॅश ऑन डिलिव्हरी, युपीआय पेमेंटवर अतिरिक्त ऑफरसह 5 दिवसांपर्यंत रिटर्नची सुविधा दिली जाणार आहे.

आणखी वाचा : 

Hyundai Venue Adventure Edition: स्टायलिश SUV फक्त ₹10.15 लाखात!

या iPhone च्या किमतीत मोठी घसरण, फक्त 39000 हजारात घरी घेऊन जा

PREV
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

Recommended Stories

AERO Token: एरोड्रोम-व्हेलोड्रोम विलीनीकरणापूर्वी AERO टोकनमध्ये मोठी उसळी, को-फाउंडर म्हणाले 'धमाका होणार'
Semiconductor Revolution: AI च्या युगात भारताची पुढची मोठी क्रांती! योग्य चिप्सच ठरवणार यशाचं रहस्य - राजीव चंद्रशेखर