
मुंबई : देशातली मोठी टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने त्यांच्या निवडक प्रीपेड ग्राहकांसाठी एक भारी 'बाय 1 गेट 1 फ्री' ऑफर आणली आहे. ही लिमिटेड-पिरेड ऑफर आहे. जे युजर्स 'एअरटेल थँक्स' ॲपवरून सिलेक्टेड प्रीपेड प्लॅन्सचा रिचार्ज करतील, त्यांनाच ही फ्री ऑफर कंपनी देत आहे.
नुकतंच देशभरात टेलिकॉम कंपन्यांनी प्लॅन्सचे रेट वाढवले. त्यामुळे ग्राहक दुसऱ्या नेटवर्कवर पोर्ट करत आहेत. हे थांबवण्यासाठी आणि स्वतःच्या ॲपचा वापर वाढवण्यासाठी एअरटेलने हा आक्रमक प्लॅन आखला आहे.
रोज डेटा वापरणाऱ्यांसाठी एअरटेलचा ₹349 चा प्रीपेड प्लॅन एकदम बेस्ट आहे. यात 28 दिवसांची व्हॅलिडिटी, रोज 2GB हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, रोज 100 SMS मिळतात. शिवाय, 5G नेटवर्क असेल तिथे अनलिमिटेड 5G डेटाही मिळतो.
जर तुम्ही 349 चा रिचार्ज केला, तर तुम्हाला पुढच्या 28 दिवसांचा रिचार्ज एकदम फ्री मिळेल, त्यासाठी एक्स्ट्रा पैसे द्यावे लागणार नाहीत. म्हणजे एकूण 56 दिवसांची व्हॅलिडिटी आणि 112GB डेटा मिळेल. यामुळे तुमचा महिन्याचा खर्च फक्त 174.50 एवढाच येईल.
यासोबतच जवळपास 4,000 किमतीचं 12 महिन्यांचं 'ॲडोब एक्स्प्रेस प्रीमियम'चं सबस्क्रिप्शन, एअरटेलचं सेफ AI स्पॅम प्रोटेक्शन आणि फ्री हॅलोट्यून सुविधाही मिळते.
डेली लिमिट नसलेला खराखुरा अनलिमिटेड 4G/5G डेटा
जास्त इंटरनेट वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एअरटेलने 399 च्या प्लॅनवरही बाय वन गेट वन (BOGO) ऑफर दिली आहे.
या प्लॅनमध्ये डेली डेटाची कोणतीही लिमिट नाही. 4G आणि 5G हँडसेट असलेल्या सर्व युजर्सना ट्रूली अनलिमिटेड डेटा मिळतो.
बाय वन गेट वन ऑफरचा फायदा - 399 देऊन ग्राहक सलग 56 दिवस (28 + 28 दिवस) न अडखळता हाय-स्पीड इंटरनेट वापरू शकतात. यामुळे महिन्याचा खर्च 200 पेक्षाही कमी होतो. या प्लॅनमध्येही 12 महिन्यांचं ॲडोब एक्स्प्रेस प्रीमियम फ्री मिळतं.
ही ऑफर फक्त 'Airtel Thanks App' वर आणि निवडक युजर्ससाठीच आहे.
तुमच्या मोबाईलमध्ये एअरटेल थँक्स ॲप ओपन करा.
रिचार्ज सेक्शनमध्ये जाऊन 349 किंवा 399 चा प्लॅन सिलेक्ट करा.
पेमेंट करण्याआधी प्लॅनच्या डिटेल्समध्ये "1+1 Recharge Free" असा टॅग दिसतोय का, ते नक्की चेक करा.
हा टॅग दिसला, तरच तुम्हाला फ्री रिचार्जचा फायदा मिळेल.
पहिल्या 28 दिवसांची व्हॅलिडिटी संपल्यानंतर, फ्री मिळालेला दुसरा रिचार्ज आपोआप किंवा व्हाउचरच्या स्वरूपात ॲक्टिव्हेट होईल.