
नवी दिल्ली : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (AIIMS) गट B आणि C मधील 2300 हून अधिक विविध पदांसाठी 'कॉमन रिक्रूटमेंट एक्झामिनेशन 2025' (CRE-2025) द्वारे अर्ज मागवले आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2025 (संध्याकाळी 05:00 वा.) आहे, त्यामुळे इच्छुकांनी त्वरा करावी.
या भरतीमध्ये असिस्टंट डायटिशियन, असिस्टंट, असिस्टंट ॲडमिन ऑफिसर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, ज्युनियर ॲडमिन असिस्टंट, निम्न श्रेणी लिपिक, असिस्टंट इंजिनिअर अशा अनेक पदांचा समावेश आहे.
या पदांसाठी 10वी/12वी उत्तीर्ण, ITI, पदवीधर, पदव्युत्तर पदवी, B.Sc, M.Sc, MSW, किंवा इंजिनिअरिंग पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. प्रत्येक पदासाठीची सविस्तर शैक्षणिक पात्रता तपासण्यासाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.
31 जुलै 2025 रोजी उमेदवारांचे वय 25/27/30/35/40/45 वर्षांपर्यंत असावे. SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षांची, तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षांची वयोमर्यादेत सूट मिळेल.
परीक्षा शुल्क:
जनरल/OBC उमेदवारांसाठी: 3000/- रुपये
SC/ST उमेदवारांसाठी: 2400/- रुपये
PWD उमेदवारांसाठी: शुल्क नाही
वेतनमान: नियमांनुसार आकर्षक वेतनमान दिले जाईल.
नोकरी ठिकाण: निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात कुठेही नियुक्ती दिली जाईल.
अर्ज करण्याची पद्धत: अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीने https://rrp.aiimsexams.ac.in/advertisement/6871d99ae3045cd386f7b850 या अधिकृत पोर्टलद्वारेच स्वीकारले जातील.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 31 जुलै 2025 (संध्याकाळी 05:00 वा.)
CBT परीक्षा: कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) परीक्षा 25 ते 26 ऑगस्ट 2025 रोजी आयोजित केली जाईल.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिक तपशील आणि सूचनांसाठी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
अधिकृत संकेतस्थळ: www.aiimsexams.ac.in
ही संधी सोडू नका! AIIMS सारख्या नामांकित संस्थेमध्ये काम करण्याची तुमची स्वप्न पूर्ण करा.