आधार कार्डमध्ये जन्मतारीख बदलण्यासाठी, जवळच्या आधार केंद्राला भेट द्यावी लागेल, अर्ज भरावा लागेल आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. आधार अपडेटसाठी किती शुल्क लागते ते पाहूया. तसेच कागदपत्रांची माहिती करुन घेऊयात.
भारतातील प्रत्येक नागरिकासाठी आधार कार्ड (UIDAI कडून जारी केलेले) ही महत्त्वाची ओळखपत्र आहे. बँक खाते, सरकारी योजना, प्रवास, डिजिटल पडताळणी अशा अनेक ठिकाणी आधार आवश्यक असतो. त्यामुळे आधारवरील माहिती – विशेषतः जन्मतारीख (DOB) – बरोबर असणे फार महत्त्वाचे आहे.
25
जन्मतारीख बदलण्याची प्रक्रिया
UIDAI ने जन्मतारीख दुरुस्तीची प्रक्रिया सोपी केली आहे. मात्र, ही प्रक्रिया ऑनलाईन करता येत नाही. त्यासाठी नागरिकांनी थेट आधार एनरोलमेंट/अपडेट सेंटरमध्ये जावे लागेल.