8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! पगारात वाढ निश्चित, पेन्शनही होणार जादा

Published : Jan 24, 2026, 08:34 PM IST

8th Pay Commission : केंद्र सरकारने 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली असून, त्याचा थेट फायदा सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्या, RBI आणि NABARD मधील कर्मचाऱ्यांना होणार आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे.

PREV
17
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! पगारात वाढ निश्चित

Salary Hike & Pension Update : सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. 8 व्या वेतन आयोगासंदर्भातील महत्त्वाचा निर्णय अखेर मंजूर झाला असून, त्याचा थेट फायदा काही केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. वेतनवाढीसोबतच पेन्शनमध्येही वाढ होणार असल्याने लाखो कुटुंबांसाठी ही आनंदाची बातमी ठरत आहे. 

27
8 व्या वेतन आयोगाची पार्श्वभूमी

केंद्र सरकारने गेल्या वर्षीच 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली होती. सध्या लागू असलेला वेतन आयोग नवीन वेतन धोरणानुसार संपुष्टात आला असून, नवीन वेतन आयोग प्रत्यक्षात लागू होण्यासाठी आणखी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. मात्र, या दरम्यानचा एरियर (थकबाकी) कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे. नवीन आयोग लागू झाल्यानंतर वेतन आणि निवृत्ती वेतनात मोठी वाढ होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. 

37
कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार थेट फायदा?

8 व्या वेतन आयोगांतर्गत केंद्र सरकारने खालील संस्थांमधील कर्मचाऱ्यांच्या वेतन व पेन्शन वाढीस मंजुरी दिली आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील जनरल इन्शुरन्स कंपन्या (PSGICs)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)

नॅशनल बँक फॉर एग्रीकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट (NABARD)

अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी यासंदर्भात अधिकृत माहिती देत सांगितले की, आर्थिक क्षेत्रातील कर्मचारी व पेन्शनधारकांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे 8 व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणी प्रक्रियेला गती मिळाल्याचे मानले जात आहे. 

47
किती कर्मचाऱ्यांना होणार लाभ?

सरकारच्या माहितीनुसार या निर्णयाचा फायदा

46,322 कर्मचारी

23,570 पेन्शनधारक

23,260 कुटुंबीय पेन्शनधारक

यांना थेट होणार आहे. यामुळे कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे. 

57
PSGIC कर्मचाऱ्यांसाठी वेतनवाढ

सार्वजनिक सेवा क्षेत्रातील विमा कंपन्यांमधील (PSGICs) कर्मचाऱ्यांसाठी नवीन वेतन पुनर्रचना करण्यात येणार आहे.

वेतन पुनर्रचना लागू तारीख : 1 ऑगस्ट 2022

एकूण वेतनवाढ : 12.41%

बेसिक पे आणि महागाई भत्त्यात वाढ : 14% 

67
NABARD कर्मचाऱ्यांसाठी मोठी वाढ

सरकारने NABARD मधील कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी वेतन व निवृत्ती वेतन पुनर्रचनेला मंजुरी दिली आहे.

नवीन वेतन लागू होण्याची तारीख : 1 नोव्हेंबर 2022

‘A’, ‘B’ आणि ‘C’ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना

वेतन व भत्त्यांमध्ये सुमारे 20% वाढ 

77
सरकारी कर्मचाऱ्यांचे आर्थिक स्थैर्य मजबूत होणार

8 वा वेतन आयोग लागू होण्याच्या दिशेने सरकारने उचललेले हे पाऊल कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा देणारे ठरणार आहे. पगारवाढ, वाढलेली पेन्शन आणि एरियरमुळे आगामी काळात सरकारी कर्मचाऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. 

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories