
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे निरोगी आहार घेणे. आहारात व्हिटॅमिन सी (संत्री, लिंबू), व्हिटॅमिन डी (मासे, दुग्धजन्य पदार्थ) आणि झिंक (कडधान्ये) युक्त पदार्थांचा समावेश करावा. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणखी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे पाहूया.
१. भरपूर पाणी प्या
दररोज भरपूर पाणी प्या. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि शरीराच्या एकूण आरोग्यासाठी पाणी पिणे महत्त्वाचे आहे.
२. पुरेशी झोप घ्या
झोपेच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते. त्यामुळे रात्री सात ते आठ तास झोप घ्या.
३. व्हिटॅमिन सी
व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे संत्री, पपई, लिंबू, आवळा, सफरचंद, पेरू, डाळिंब, किवी, अंडी, पालक, ढोबळी मिरची इत्यादींचे सेवन करा.
४. झिंक
झिंकयुक्त पदार्थ खाल्ल्यानेही रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. यासाठी आहारात कडधान्ये, नट्स आणि बियांचा समावेश करू शकता.
५. मसाले
हळद, काळी मिरी, आले, लसूण यांसारख्या मसाल्यांचा आहारात समावेश केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
६. व्हिटॅमिन डी
व्हिटॅमिन डी रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे वारंवार संसर्ग आणि आजार होऊ शकतात. त्यामुळे आहारात व्हिटॅमिन डी युक्त मासे (उदा. सॅल्मन), मशरूम, दुग्धजन्य पदार्थ, अंड्यातील पिवळा बलक इत्यादींचा समावेश करा.
७. तणाव कमी करा
मानसिक तणाव नियंत्रित करणे देखील शरीराच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.
८. व्यायाम
नियमित व्यायाम केल्यानेही रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
टीप: आरोग्य तज्ज्ञ किंवा पोषणतज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच आहारात बदल करा.