Constipation Tips : बद्धकोष्ठतेचा त्रास होतोय? नाश्त्यात करा 'या' ८ पदार्थांचा समावेश अन् पहा फायदा

Published : Dec 20, 2025, 07:06 PM IST
Constipation Tips : बद्धकोष्ठतेचा त्रास होतोय? नाश्त्यात करा 'या' ८ पदार्थांचा समावेश अन् पहा फायदा

सार

नाश्ता हा आरोग्यासाठी फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे नाश्यात जर तुम्ही काही हलके आणि पचायला सोपे पदार्थ घेतले तर तुम्हाला नक्की फायदा होईल. यात पोहे हा एक खूपच चांगला पदार्थ आहे. यामुळे यामुळे फायबर, खनिजे आणि दिवसभर ऊर्जा मिळते.

प्रत्येकासाठी नाश्ता हा खूपच महत्त्वाचा असतो. नाश्ता केला नाही तर अनेकांना त्रास होतो. भूक लागते. त्यामुळे नाश्ता हा तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवण्यास मदत करतो. तसेच ज्यांना बद्धकोष्ठता, गॅस, ॲसिडिटी यांसारख्या समस्या आहेत, त्यांनी नाश्त्याकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. आहारात पचनासाठी योग्य पदार्थांचा समावेश करावा, असे आहारतज्ज्ञ डॉ. प्रत्यक्षा भारद्वाज सांगतात. 

म्हणून तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये कोणते पदार्थ समाविष्ट करावेत, ज्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो, याचबाबत आपण आज जाणून घेऊयात. 

ओट्स -

ओट्समध्ये बिया घालून खाण्याची सवय लावा. ओट्समध्ये विरघळणारे फायबर, विशेषतः बीटा-ग्लुकन भरपूर प्रमाणात असते. हे आतड्यांच्या हालचाली सुरळीत ठेवण्यास मदत करते आणि चांगल्या आतड्यांतील बॅक्टेरियाचे पोषण करते. चिया सीड्स आणि जवसाच्या बिया घातल्याने फायबरचे प्रमाण वाढते आणि सूज कमी होण्यास मदत होते. गरम ओट्स खाल्ल्याने ते पचायला अधिक सोपे होतात.

पोहे - 

पोहे हा आणखी एक पदार्थ आहे. नाश्त्यात पोह्यांचा समावेश केल्यास ते पोटासाठी हलके आणि पचायला सोपे असतात. भाज्या आणि शेंगदाणे घालून शिजवल्यास ते अधिक फायदेशीर ठरतात. यामुळे फायबर, खनिजे आणि दिवसभर ऊर्जा मिळते.

दही - 

दह्यामध्ये नैसर्गिक प्रोबायोटिक्स असतात, जे आतड्यांच्या आरोग्यासाठी चांगले असतात आणि पचन सुधारतात. हे पपई, केळी किंवा सफरचंद यांसारख्या फळांसोबत खावे. संत्रीसारखी आंबट फळे सकाळी दह्यासोबत खाणे टाळावे, कारण त्यामुळे ॲसिडिटी होऊ शकते.

इडली आणि सांबर - 

नाश्त्यामध्ये इडली आणि सांबार यांचा समावेश करणे खूप चांगले आहे. हे पचायला सोपे असते.

कडधान्ये - 

मोड आलेल्या कडधान्यांमध्ये एन्झाइम्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. हे पचन आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी मदत करते. त्यांना हलके वाफवून घेतल्यास ते पचायला सोपे होतात.

ड्राय फ्रुट्स - 

भिजवलेले ड्राय फ्रुट्स आणि पाण्यासोबत फळे खाल्ल्याने अन्न पचायला सोपे जाते.

उपमा -

चांगला शिजवलेला उपमा वजन कमी करण्यास आणि पोटातील अस्वस्थता टाळण्यास मदत करतो. त्यात भाज्या घातल्याने फायबरचे प्रमाण वाढते, बद्धकोष्ठता टाळण्यास मदत होते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते.

मनुके - 

सकाळी भिजवलेल्या मनुक्यांसोबत कोमट पाणी प्यायल्याने पचनसंस्था दिवसभरासाठी तयार होते आणि बद्धकोष्ठता कमी होते.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांनो सावधान! PM किसानचा हप्ता हवाय? मग 'हे' काम आजच पूर्ण करा!
Job Opportunities : परीक्षा नाही, थेट सरकारी नोकरीची संधी! Coal India मध्ये ट्रेनी भरती; अर्ज कसा करायचा?