Terrace Garden: टेरेस गार्डनसाठी ७ बेस्ट कुंड्या, ज्या उन्हाळ्यात ना रंग सोडतील, ना तुटतील!

Published : Apr 09, 2026, 04:25 PM IST
terrace garden planter ideas

सार

तुमच्या टेरेस गार्डनमधल्या कुंड्या कडक उन्हामुळे लवकर खराब होतात का? यामुळे झाडांचंही नुकसान होतं. जर तुम्हाला बाग जास्त काळ टिकावी असं वाटत असेल, तर योग्य कुंडी निवडणं गरजेचं आहे. फायबर, ग्रो बॅग, सिमेंट आणि टेराकोटासारखे ७ टिकाऊ पर्याय ऊन-पावसातही टिकून राहतात.

कडक उन्हामुळे टेरेस गार्डनमधल्या कुंड्यांना लवकर तडे जातात, त्यांचा रंग फिका पडतो आणि ऊन-पावसात त्या तुटतातही. जर तुम्हाला तुमच्या टेरेसवर एक छान आणि जास्त काळ टिकणारी बाग तयार करायची असेल, तर योग्य कुंड्या निवडणं खूप महत्त्वाचं आहे. चुकीच्या कुंड्यांमुळे माती लवकर सुकते, झाडं करपतात आणि त्यांची वाढ खुंटते. आज आम्ही तुम्हाला टेरेस गार्डनसाठी ७ बेस्ट कुंड्यांचे ऑप्शन्स सांगणार आहोत, जे ऊन, पाऊस आणि गरमी, सगळं काही सहन करतात आणि लवकर खराब होत नाहीत.

सर्वात हलक्या आणि टिकाऊ फायबरच्या कुंड्या

फायबरपासून बनवलेल्या कुंड्या ऊन, पाणी आणि हवा, या तिन्ही गोष्टींमध्ये टिकून राहतात. या तुटत नाहीत, त्यांचा रंग जात नाही आणि वजनाला खूप हलक्या असतात. त्यामुळे मोठ्या आकाराच्या कुंड्याही सहज उचलता येतात. या कुंड्यांच्या आतली माती थंड राहते, ज्यामुळे झाडांची वाढ चांगली होते. टेरेस गार्डनसाठी हा सर्वात जास्त काळ टिकणारा पर्याय मानला जातो.

खिशाला परवडणाऱ्या ग्रो बॅग्ज (Grow Bags)

जर तुम्हाला झाडांची वाढ दुप्पट वेगाने व्हावी असं वाटत असेल, तर ग्रो बॅग्ज सर्वोत्तम आहेत. या बॅग्ज हवा खेळती राहील अशा फॅब्रिकपासून बनवलेल्या असतात. यातील पाणी लवकर सुकत नाही आणि झाडांची मुळं चांगली पसरतात, ज्यामुळे झाडं निरोगी राहतात. कमी बजेटमध्ये जास्त झाडं लावायची असतील, तर ग्रो बॅग्ज नक्की घ्या.

मॉडर्न आणि लेटेस्ट मेटलच्या कुंड्या

मेटलच्या कुंड्या उष्णता सहन करतात आणि लवकर खराब होत नाहीत. जोराच्या वाऱ्यात उडत नाहीत आणि गंजरोधक (rust-free) कुंड्या तर खूप जास्त काळ टिकतात. या कुंड्या बागेला एक मॉडर्न टच देतात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, यांना थेट उन्हात ठेवू नका, नाहीतर माती लवकर गरम होते. यांना थोड्या सावलीच्या ठिकाणी ठेवा.

माती थंड ठेवणाऱ्या टेराकोटा कुंड्या

टेराकोटा म्हणजेच भाजलेल्या मातीच्या कुंड्या उन्हाळ्यात उष्णता नियंत्रित करतात. त्या मातीला थंड ठेवतात, जास्त पाणी झाल्यास शोषून घेतात आणि त्यामुळे झाडं जास्त ताजी-तवानी दिसतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की या कुंड्या खाली पडल्यास फुटू शकतात, त्यामुळे त्यांना कोपऱ्यात सुरक्षित जागी ठेवा.

सुपर स्ट्रॉन्ग सिमेंटच्या कुंड्या

जर तुम्हाला अशी कुंडी हवी असेल जी वर्षानुवर्षे तुटणार नाही, तर सिमेंटची कुंडी घ्या. या खूप मजबूत असतात आणि ऊन, पाऊस, थंडी सगळं काही सहन करतात. फायकस, मॉन्स्टेरा, लिंबू यांसारख्या मोठ्या झाडांसाठी या कुंड्या perfec आहेत. फक्त यांचं वजन खूप जास्त असतं, त्यामुळे एकदा ठेवल्यावर त्यांना हलवणं खूप अवघड होऊन बसतं.

हलक्या आणि स्वस्त प्लास्टिकच्या कुंड्या

टेरेस गार्डनमध्ये प्लास्टिकच्या कुंड्या सर्वात जास्त वापरल्या जातात. त्या वजनाला हलक्या असतात आणि अनेक रंगांमध्ये व स्टाईलमध्ये मिळतात. चांगल्या क्वालिटीच्या प्लास्टिक कुंड्या उन्हात २-३ वर्षं आरामात टिकतात. पण लक्षात ठेवा की कमी क्वालिटीच्या कुंड्यांना उन्हामुळे लगेच तडे जातात, त्यामुळे नेहमी चांगल्या प्रतीची (प्रीमियम) कुंडीच निवडा.

प्रीमियम आणि नॅचरल लूक देणारे लाकडी प्लांटर्स

लाकडी प्लांटर्स तुमच्या टेरेसला एका लक्झरी गार्डनमध्ये बदलून टाकतात. ते उष्णता संतुलित ठेवतात, ज्यामुळे मुळांना नैसर्गिक थंडावा मिळतो. मोठ्या आकाराचे आणि उंच लाकडी प्लांटर्स खूप सुंदर दिसतात. फक्त लाकूड जास्त काळ टिकावं यासाठी त्याला वॉटर-प्रूफ कोटिंग करून घ्यायला विसरू नका.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Dangerous Plants: दिसायला सुंदर, पण आहेत जीवघेणी; ही 7 झाडं घरात लावण्याआधी दोनदा विचार करा!
Business Idea: जुने टायर आणि बाटल्यांपासून महिन्याला कमवा ₹30,000! भंगार नाही, हा तर पैसे कमावण्याचा जुगाड