kitchen tips : स्वयंपाकघरात भाज्यांशिवाय आपलं पान हलत नाही. आपण त्या कच्च्या आणि शिजवून खातो. पण, जर त्या योग्यप्रकारे साठवल्या नाहीत तर भाज्या लवकर खराब होतात. जाणून घेऊया, कोणत्या मुख्य गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.
भाज्या योग्य पद्धतीने साठवल्या नाहीत, तर त्यातील पोषक तत्वे नष्ट होण्याची शक्यता जास्त असते. जास्त तापमान, प्रकाश आणि ओलावा यामुळे भाज्या खराब होऊ शकतात.
26
भाज्या जास्त धुऊ नका
भाज्या जास्त धुतल्यानेही त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात. तसेच, भाज्या घासून घासून धुणे टाळावे.
36
साल काढणे टाळा
गरज नसताना भाज्यांची साल काढणे टाळा. बहुतेक भाज्यांच्या सालीमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर असतात. साल काढल्यामुळे पोषक तत्वे नष्ट होतात.