माठापासून बनवा गणपती
मोठ्या आणि लहान माठांचा वापर करून गणपतीची मूर्ती बनवा. इथे दोन माठ एकमेकांना जोडून आणि क्ले वापरून हे सुंदर गणपती बाप्पा साकारले आहेत. आधी माठांना सुंदर आकारात कापलं आहे. त्यानंतर रंग, पेंट आणि सजावटीच्या वस्तूंनी डोळे, सोंड आणि मुकुट यांसारखे तपशील तयार केले आहेत. शेवटी फुलं, दिवे किंवा लाइट्सने सजवून एक सुंदर गणपती डेकोर तयार केला आहे.