
वाढत्या वयासोबत चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात आणि चेहऱ्यावरचा ग्लोही कुठेतरी हरवून जातो. शरीरातील हार्मोनल बदल आणि एजिंगमुळे ही समस्या आणखी वाढते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी, सैल पडलेली त्वचा पुन्हा घट्ट करण्यासाठी आणि मेकअपशिवाय चेहऱ्यावर गुलाबी चमक आणण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करू शकता.
तुम्ही तुमच्या आहारात बीटचा समावेश करू शकता. बीटमध्ये लोह आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे खाल्ल्याने रक्ताभिसरण (blood circulation) सुधारतं. जर तुम्ही रोजच्या आहारात सॅलडच्या स्वरूपात बीट खाल्ले, तर काही दिवसांतच तुम्हाला चांगला फरक दिसून येईल.
पालकमध्ये लोह आणि व्हिटॅमिन सी असतं, जे रक्ताची कमतरता दूर करून त्वचेला आतून निरोगी बनवतात. यामुळे सुरकुत्यांची समस्या कमी होते आणि त्वचा घट्ट होते. तुम्ही रोजच्या जेवणात पालक सूप, पालक स्मूदी किंवा पालकची डाळ खाऊ शकता. सोबतच इतर हिरव्या पालेभाज्यांचाही आहारात समावेश करू शकता.
अक्रोड, बदाम, जवस (flax seeds) यांसारखे नट्स आणि बिया खायला सुरुवात करा. यामध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि व्हिटॅमिन ई आढळते. तुम्ही नाश्त्यामध्ये नट्स किंवा बियांचे सेवन करू शकता.
जर तुम्ही अॅव्होकॅडो खात नसाल, तर निरोगी त्वचेसाठी ते खाण्यास सुरुवात करा. अॅव्होकॅडोमध्ये हेल्दी फॅट्ससोबत व्हिटॅमिन ए देखील असतं. यामुळे त्वचेच्या पेशींना पोषण मिळतं आणि चेहरा तरुण दिसतो.
गाजरामध्ये बीटा-कॅरोटीनचं प्रमाण जास्त असतं, जे त्वचेला निरोगी ठेवण्यासोबतच चमकदार बनवतं. तुम्ही लाल किंवा नारंगी रंगाचं गाजर खाऊ शकता. रोज गाजर खाल्ल्याने त्वचेचा टोन सुधारण्यासही मदत होते.