
घरातला फरशी पुसायचा वायपर जास्त वापरल्यामुळे तुटतो आणि आपण तो सरळ भंगारात विकतो किंवा फेकून देतो. पण काही सोप्या युक्त्या वापरून तुम्ही त्याचा पुन्हा वापर करू शकता. तुटक्या वायपरचा दांडा आणि प्लॅस्टिक हेड दोन्ही तुमच्या कामी येऊ शकतं. चला पाहूया, तुटक्या वायपरचा पुन्हा वापर कसा करायचा.
अनेकदा आपल्याला भिंतीवर डेकोरेशनसाठी फेअरी लाईट्स लावायचे असतात, पण कशाचातरी सपोर्ट नसल्यामुळे ते शक्य होत नाही. तुमच्याकडे तुटक्या वायपरचा दांडा असेल, तर त्यावर फेअरी लाईट्स, फोटो किंवा कागदी फुलं लावून तुम्ही तुमची रूम छान सजवू शकता.
जर वायपर खालच्या बाजूने तुटला असेल आणि त्याचा लांब दांडा शिल्लक असेल, तर तुम्ही त्याला रंगवून हँगिंग पॉट स्टँड बनवू शकता. यात सुंदर रोपं लटकवून तुम्ही तुमच्या बाल्कनीची शोभा वाढवू शकता.
तुटक्या वायपरचा उपयोग साफसफाईसाठीही करता येतो. फक्त वायपरचं हेड तुटलं असेल आणि दांडा चांगला असेल, तर त्यात स्क्रब ब्रश किंवा डस्टर लावून तुम्ही छताचा पंखा किंवा खिडक्या स्वच्छ करू शकता. यामुळे खिडक्या साफ करणंही खूप सोपं होतं.
वायपरचा दांडा जर तुम्ही भिंतीवर लावला, तर त्यावर अनेक गोष्टी सहज टांगता येतात. किचनमध्येही टॉवेल, साफसफाईचं कापड वगैरे ठेवण्यासाठी वायपरच्या दांड्याचा होल्डर म्हणून वापर करता येतो.
घरातील खिडक्या लहान असतील, तर तुटक्या वायपरच्या दांड्यापासून पडद्यांसाठी तात्पुरता रॉड बनवता येतो. तो भिंतीवर लावून तुम्ही त्यावर पडदे टांगू शकता.