Travel Tips : रात्रीच्या वेळेस प्रवास करताना लक्षात ठेवा या 5 गोष्टी, रहाल सुरक्षित

सार

रात्रीच्या वेळेस काही वेळा प्रवास करावा लागतो. खासकरुन लांब पल्ल्याचा प्रवास केला जातो. अशातच रात्रीच्या वेळेस प्रवास करताना आपली सुरक्षितता बाळगणेही तितकेच महत्वाचे आहे. यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबद्दल जाणून घेऊ.

Travel Tips : रात्रीच्या वेळेस प्रवास करणे बहुतांशजणांना आरामदायी वाटते. यावेळी रस्ते मोकळे असल्याने गाडी सुस्साट चालवली जाते. एवढेच नव्हे ज्या ठिकाणी पोहोचायचे आहे तेथे जाण्यासाठी लवकर पोहोचता येते. पण रात्रीच्या वेळेस प्रवास करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबद्दल जाणून घेऊया.

रात्रीच्या वेळेस प्रवास करताना सर्वाधिक मोठे आव्हान म्हणजे सुरक्षितता आहे. काळोखात कमी प्रकाशात गाडी चालवताना अपघाताची शक्यता वाढली जाते. अशातच रात्रीच्या वेळेस प्रवास करण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टींची काळजी घ्या.

झोप पूर्ण करा

रात्रीच्या वेळेस प्रवास करणार असाल तर सर्वाधिक मोठे आव्हान म्हणजे झोप पुर्ण झालेली असावी. तुम्ही गाडी चालवणार असाल तर प्रवासापूर्वी 7-8 तासांची झोप घ्या. जेणेकरुन रात्रीच्या वेळेस गाडी चालवताना दुर्घटना होण्याची शक्यता कमी होते. लांब पल्ल्याचा प्रवास असेल तर मध्येमध्ये थांबा. याशिवाय गाडी चालवून अधिक थकवा आल्यास दुसऱ्याला चालवण्यास सांगा.

रस्त्यांची माहिती घ्या

रात्रीच्या वेळेस प्रवास करताना रस्त्यांबद्दल माहिती असावी. यामुळे प्रवासावेळी GPS नॅव्हिगेशन सुरू ठेवा आणि बॅकअपसाठी ऑफलाइन मॅप डाउनलोड करुन ठेवा. शक्य असल्यास, प्रवासाधीच रस्त्यांबद्दल माहिती मिळवा. जेणेकरुन अज्ञात ठिकाणी त्रास होणार नाही.

कार किंवा बाइकची स्थिती तपासून पहा

रात्रीच्या वेळेस प्रवास करताना गाडी व्यवस्थितीत असणे महत्वाचे आहे. प्रवासापूर्वी गाडीची स्थिती पहा. हेडलाइट्स आणि इंडिकेटर्स व्यवस्थितीत काम करत आहेत की नाही पहा. ब्रेक, टायरमधील हवा, फ्यूल टँक पूर्णपणे भरा. याशिवाय एक्स्ट्रा टायर, टॉर्च आणि टूलकिटही गाडीत ठेवा. हेल्मेट किंवा रिफ्लेक्टिव्ह जॅकेट घाला.

सुरक्षित ठिकाणी थांबा

रात्रीच्या वेळेस प्रवास करताना ब्रेक घ्यावा लागतो. यामुळे सुरक्षित ठिकाणी थांबा. अज्ञात ठिकाणी गाडी थांबवणे टाळा. महामार्ग, पेट्रोल पंप किंवा एखाद्या उत्तम रेस्टॉरंटमध्ये थांबा. सार्वजनिक वाहतूकीच्या माध्यमातून प्रवास करत असाल तर स्टेशन किंवा बस स्टँडवर अ‍ॅलर्ट रहा.

मोबाइल आणि अन्य महत्वाच्या गोष्टी

रात्रीच्या वेळेस प्रवास करताना मोबाइल पूर्णपणे चार्ज करुन ठेवा. याशिवाय पॉवर बँकही सोबत ठेवा. आपत्कालीन क्रमांक जसे की, परिवारातील सदस्य, पोलीस, रुग्णालय यांचे क्रमांक सेव्ह करा. पाकिटात पैसे आणि कार्डही ठेवा. काही ठिकाणी डिजिटल पेमेंटचा पर्याय नसतो. एकट्याने प्रवास करताना विश्वासू व्यक्तीला आपले लाइव्ह लोकेशन पाठवा.

Share this article