T20 World Cup 2026 : भारतात खेळण्यास नकार दिल्यानंतर ICC ने T20 विश्वचषकातून बांगलादेशला बाहेर काढून त्याच्या जागी स्कॉटलंडला अधिकृतपणे स्पर्धेत सामील केले आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण काय आहे आणि स्कॉटलंडच्या एन्ट्रीने काय बदलणार?
ICC ने 23 जानेवारीला या निर्णयाला दुजोरा दिला. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) सुरक्षेची चिंता व्यक्त केली होती. ICC ने वेळेत निर्णय न घेतल्यास दुसऱ्या संघाला संधी देणार असल्याचे स्पष्ट केले होते.
25
जय शाह यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक
यावर निर्णय घेण्यासाठी ICC ने दुबईत विशेष बैठक बोलावली, अध्यक्षस्थानी जय शाह होते. वेळापत्रक पाहता आणखी वाट पाहणे शक्य नाही, असे ठरले. बांगलादेशची मागणी फेटाळत ICC ने निर्णयावर शिक्कामोर्तब केले.
35
पत्रकार परिषद आणि बहिष्काराचा निर्णय
ICC च्या इशाऱ्यानंतर, BCB ने पत्रकार परिषद घेऊन T20 विश्वचषक 2026 वर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली. त्यामुळे बांगलादेशच्या जागी दुसरा संघ खेळणार हे निश्चित झाले.
बांगलादेश बाहेर पडल्याने स्कॉटलंडला संधी मिळाली. स्कॉटलंडने 5 T20 विश्वचषक खेळले आहेत. 2022 आणि 2024 मध्ये चांगली कामगिरी केली होती. ICC रँकिंगच्या आधारावर त्यांची निवड झाली.
55
स्कॉटलंड कोणत्या गटात खेळणार?
स्कॉटलंडला ग्रुप C मध्ये ठेवले आहे. या गटात इंग्लंड, वेस्ट इंडिज, इटली आणि नेपाळ आहेत. स्कॉटलंडचा पहिला सामना 7 फेब्रुवारीला वेस्ट इंडिजविरुद्ध कोलकाता येथे होईल. त्यानंतर इटली, इंग्लंड आणि नेपाळशी सामने होतील.