बंगळुरू: १८ व्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचे फक्त दोन सामने शिल्लक आहेत. दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी यावेळी IPL ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाबाबत भाकीत वर्तवला आहे. काय ते पाहूया.
२०२५ च्या IPL मध्ये RCB प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. त्यांचं स्वप्न पहिली IPL ट्रॉफी जिंकण्याचं आहे.
27
दुसऱ्या स्थानासाठी पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात चुरस पाहायला मिळाली. क्वालिफायर १ मध्ये RCB ने पंजाबचा पराभव केला. तर गुजरात टायटन्सवर मुंबईने २० धावांनी विजय मिळवला.
37
RCB आणि पंजाब किंग्ज यांच्यातील क्वालिफायर १ हा सामना चुरशीचा होईल अशी अपेक्षा होती. पण RCB च्या गोलंदाजीपुढे पंजाब १०१ धावांतच गारद झाला. RCB ने १० षटके शिल्लक असताना ८ गडी राखून विजय मिळवला.
या स्पर्धेत कोण विजेतेपद पटकावेल याची उत्सुकता आहे. आता सुनील गावसकर यांनी RCB च्या कामगिरीचं कौतुक केलं आहे.
57
RCB फक्त एक-दोन फलंदाज किंवा एका गोलंदाजावर अवलंबून नाही. प्रत्येक खेळाडू संघासाठी योगदान देत आहे, असं गावसकर म्हणाले.
67
याचमुळे RCB अंतिम फेरीत पोहोचला आहे. ३ जून रोजी RCB विजेतेपद पटकावेल, असा गावसकर यांचा अंदाज आहे.
77
RCB ने तीन वेळा अंतिम फेरी गाठली आहे, पण प्रत्येक वेळी ते उपविजेते राहिले आहेत. आता चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहोचलेल्या RCB ला यश मिळेल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.