Sourav Ganguly : 'दादा' सौरव गांगुली आणि पत्नीला जीवे मारण्याची धमकी; कोलकाता पोलिसांत तक्रार दाखल

Published : Aug 11, 2026, 12:56 PM IST
Sourav Ganguly : 'दादा' सौरव गांगुली आणि पत्नीला जीवे मारण्याची धमकी; कोलकाता पोलिसांत तक्रार दाखल

सार

गेले काही महिने धमकीची पत्रं येत होती, पण सौरव गांगुलीने सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र आता थेट जीवे मारण्याची धमकी आल्याने त्याने पोलिसांत धाव घेतली आहे.

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली आणि त्यांची पत्नी डोना गांगुली यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सतत धमकीची पत्रं येत असल्यामुळे गांगुलीने अखेर पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल केली आहे. या पत्रांमध्ये आपल्याला आणि आपल्यासोबतच्या लोकांना धोका पोहोचवण्याची धमकी दिली असल्याचं गांगुलीने तक्रारीत म्हटलं आहे.

कुटुंबाला धोका, जीवे मारण्याची धमकी

सोमवारी कोलकातामधील 'क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल' (CAB) च्या कार्यालयात अत्यंत कडक शब्दांत लिहिलेली दोन पत्रं मिळाली. यानंतर गांगुलीने दक्षिण कोलकातामधील ठाकूरपुकुर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. कोलकाता पोलिसांनी गांगुलीच्या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी तपास सुरू झाला असून, मिळालेली पत्रं, ज्या कुरिअर कंपनीने ती पाठवली, तो मार्ग या सगळ्याची सखोल चौकशी सुरू आहे. गुन्हेगारांना लवकरच पकडलं जाईल, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

सहा महिन्यांपासून पत्र येत होती पण…

गेल्या सहा महिन्यांपासून गांगुलीच्या नावाने अशी पत्रं येत होती, पण सुरुवातीला त्याने याकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं. मात्र, सोमवारी जीवे मारण्याची धमकी देणारी पत्रं मिळाल्याने प्रकरण गंभीर बनलं. प्राथमिक तपासात ही पत्रं उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बेलघरिया येथून पाठवण्यात आल्याचं समोर आलं आहे. मेसेज पाठवण्यासाठी वापरलेला मोबाईल नंबर आणि सिम कार्डच्या लोकेशनवर लक्ष केंद्रित करून तपास पुढे जात आहे.

पोलिसांकडून कसून तपास सुरू

पोलिसांनी संबंधित कुरिअर एजन्सीच्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली असून, त्यांच्याबद्दल अधिक माहिती गोळा केली जात आहे. ही सर्व पत्रं एकाच व्यक्तीने पाठवली आहेत का आणि यामागे नेमका हेतू काय आहे, याचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Zombie Drug : 'पंजाबमध्ये झोम्बी ड्रग्स', हरभजन सिंगकडून व्हिडिओ शेअर; पण पोलिसांनी सांगितलं नेमकं सत्य
Virushka: विरुष्काचा सिंपल पण क्युट क्षण, विराटने शेअर केला मॅचिंग शूजचा फोटो