Zombie Drug : 'पंजाबमध्ये झोम्बी ड्रग्स', हरभजन सिंगकडून व्हिडिओ शेअर; पण पोलिसांनी सांगितलं नेमकं सत्य

Published : Aug 11, 2026, 12:42 PM IST
Zombie Drug : 'पंजाबमध्ये झोम्बी ड्रग्स', हरभजन सिंगकडून व्हिडिओ शेअर; पण पोलिसांनी सांगितलं नेमकं सत्य

सार

माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने एक व्हिडिओ शेअर करत पंजाबमध्ये 'झोम्बी ड्रग' आल्याचा दावा केला. पण पंजाब पोलिसांनी हा दावा फेटाळला असून, हा व्हिडिओ राजस्थानच्या श्री गंगानगरमधील असल्याचं स्पष्ट केलं आहे.

चंदीगड : माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे राज्यसभा खासदार हरभजन सिंग यांनी एक व्हिडिओ शेअर केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या व्हिडिओमध्ये पंजाबमधील तरुण 'झोम्बी ड्रग'च्या नशेत विचित्र अवस्थेत उभे असल्याचा दावा त्यांनी केला होता. यावरून त्यांनी पंजाब सरकारवर टीका करत तरुणांना नशेच्या विळख्यातून वाचवण्याचं आवाहनही केलं.

मात्र, पंजाब पोलिसांनी हरभजन सिंग यांचा दावा खोडून काढला आहे. त्यांनी शेअर केलेला व्हिडिओ पंजाबमधला नाहीच, असं पोलिसांनी स्पष्ट केलंय. पंजाब पोलिसांच्या फॅक्ट-चेक विभागानुसार, हा व्हिडिओ राजस्थानच्या श्री गंगानगरमधील आहे. व्हिडिओतील पंजाबी भाषा आणि कपड्यांमुळे गैरसमज करून घेऊ नका. कोणतीही गोष्ट शेअर करण्यापूर्वी सत्यता तपासा, असं आवाहनही पोलिसांनी केलं आहे.

पंजाबच्या मंत्री डॉ. बलजीत कौर यांनीही हरभजन सिंग यांच्यावर जोरदार टीका केली आहे. "भाजपच्या राजकारणाचा भाग म्हणून हरभजन पंजाबची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजप नेत्यांना खूश करण्यासाठी हरभजन हे सर्व करत आहेत," असा आरोप त्यांनी केला.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दोन तरुण पुतळ्यासारखे स्थिर उभे असलेले दिसतात. मात्र, त्यांनी खरंच ड्रग्ज घेतलं होतं की नाही, याची कोणतीही अधिकृत माहिती नाही. ज्या 'झोम्बी ड्रग'बद्दल बोललं जातंय, ते म्हणजे 'झायलाझिन' (Xylazine) नावाचं एक ड्रग आहे, जे खरंतर प्राण्यांना बेशुद्ध करण्यासाठी वापरलं जातं. परदेशात या ड्रगचा मोठा फैलाव झाला असून, अलीकडे भारतातही त्याचे रुग्ण आढळल्याच्या चर्चा आहेत. हे ड्रग घेतल्यावर व्यक्ती तासन्तास शुद्ध हरपून विचित्र अवस्थेत उभी राहते, म्हणूनच याला 'झोम्बी ड्रग' असं नाव पडलं आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Virushka: विरुष्काचा सिंपल पण क्युट क्षण, विराटने शेअर केला मॅचिंग शूजचा फोटो
Sourav Ganguly: सचिन, सेहवाग, कोहलीलाही जमलं नाही; 'दादा'च्या नावावर आहे असा वर्ल्ड रेकॉर्ड जो आजही अबाधित आहे!