India vs England : गिल, अक्षर, सुंदर चमकले; रोहित-कोहली फेल, भारताचा विजय

Published : Jul 14, 2026, 11:44 PM IST
India vs England : गिल, अक्षर, सुंदर चमकले; रोहित-कोहली फेल, भारताचा विजय

सार

एजबॅस्टनवर 2015 नंतर इंग्लंडचा हा पहिलाच एकदिवसीय पराभव आहे. विशेष म्हणजे, 2014 मध्ये याच मैदानावर इंग्लंडला भारताकडूनच शेवटचा पराभव पत्करावा लागला होता.

बर्मिंगहॅम: एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने इंग्लंडवर ६ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला आहे. शुभमन गिल, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियाने हा विजय साकारला. इंग्लंडने दिलेलं २५९ धावांचं लक्ष्य भारताने चार विकेट्स गमावून सहज पार केलं. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

भारताकडून शुभमन गिलने ७५ चेंडूत ८० धावांची खेळी केली, पण दुखापतीमुळे तो रिटायर्ड हर्ट झाला. वॉशिंग्टन सुंदर ५२ धावांवर तर अक्षर पटेल ५७ धावांवर नाबाद राहिले. मात्र, रोहित शर्मा (११), विराट कोहली (५) आणि के.एल. राहुल (१) यांनी निराशा केली. श्रेयस अय्यरने ३५ धावांचं योगदान दिलं. मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी कार्डिफमध्ये खेळवला जाईल. स्कोअर: इंग्लंड ४७.५ षटकांत सर्वबाद २५८, भारत ४५.२ षटकांत ४ बाद २६२.

 

एजबॅस्टनच्या मैदानावर २०१५ नंतर इंग्लंडचा हा पहिलाच एकदिवसीय पराभव आहे. विशेष म्हणजे, २०१४ मध्ये याच मैदानावर इंग्लंडला भारताकडूनच शेवटचा पराभव पत्करावा लागला होता. इंग्लंडविरुद्ध भारताचा हा सलग सहावा एकदिवसीय विजय आहे. याआधी टी-२० मालिकेत ०-४ ने पराभूत झालेल्या भारतीय संघाचा या दौऱ्यातील हा पहिलाच विजय आहे.

२५९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. रोहित आणि कोहली स्वस्तात परतले. पण त्यानंतर गिल आणि श्रेयसने शतकी भागीदारी करून भारताला १०० धावांच्या पुढे नेलं. गिल दुखापतीमुळे परतल्यानंतर श्रेयस आणि राहुलही लवकर बाद झाले. पण पाचव्या विकेटसाठी सुंदर आणि अक्षर पटेल यांनी १०२ धावांची अभेद्य भागीदारी रचत भारताला सहज विजय मिळवून दिला.

 

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडची अवस्था एका क्षणी ६ बाद १०७ अशी झाली होती. पण जो रूट (नाबाद ७६) आणि लियाम डॉसन (६८) यांच्या अर्धशतकी खेळी आणि शतकी भागीदारीमुळे इंग्लंडने ४७.५ षटकांत २५८ धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या, तर गुरनूर ब्रार आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या.

एशियानेट न्यूज लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

PREV

क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.

Read more Articles on

Recommended Stories

Sanju Samson: संजू सॅमसनची टीकाकारांना चपराक, रांचीत ठोकल्या वादळी 82 धावा
Kapil Dev: वैभव सूर्यवंशीला कपिल देव यांचा मोलाचा सल्ला, विनोद कांबळीचं दिलं उदाहरण