सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर सध्या ऑस्ट्रेलियात आहे. ऑस्ट्रेलियातील प्रत्येक ठिकाण पाहून तिने आपला आनंद व्यक्त केला आहे. आपल्या प्रवासातील एक झलक तिने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. ऑस्ट्रेलियातील गोड आठवणी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत.
24
प्रेमात पडल्याचे सांगितले साराने
या शहराच्या प्रेमात पडण्याचे कारण साराने सांगितले. "स्टोरी ब्रिजवरील सूर्यास्तापासून ते ईट स्ट्रीट नॉर्थशोअरमधील खवय्यांच्या स्वर्गापर्यंत, स्काय डेकवरील सूर्यास्तापासून ते डंगलूमा आयलंड रिसॉर्टमधील साहसांपर्यंत!" असे तिने भावनिक होऊन सांगितले.
क्रीडा संचालिका ग्रेस हेडनसोबत जेवणाचा आनंद घेतानाचे फोटो साराने शेअर केले. दोघींनीही एकत्र चांगला वेळ घालवल्याचे दिसून येते. दोघींमधील मैत्री चांगल्या जेवण आणि संवादातून दृढ झाली आहे. दोघींची मैत्री साराच्या ऑस्ट्रेलियातील अनुभवात एक वेगळीच भर घालते.
34
साराचे सुंदर फोटो
सारा तेंडुलकरने शेअर केलेले हे फोटो नेटकऱ्यांनी व्हायरल केले आहेत. ''सारा खूप गोंडस दिसतेय. ऑस्ट्रेलिया तिच्यामुळे अधिक सुंदर दिसत आहे'' अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत. ''काय! तुम्हीच आला आहात! शुभमन गिल आला नाही का?'' असे काही नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.
भारतीय क्रिकेट संघाचा युवा खेळाडू शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर हे डेटिंग करत असल्याच्या आणि दोघेही एकत्र फिरत असल्याच्या अफवा नेटकऱ्यांनी पसरवल्या होत्या.
याबाबत अनेक वर्षांपासून अफवा पसरत असताना, अलीकडेच शुभमन गिलने यावर पडदा टाकला. तो अनेक वर्षांपासून एकटा असल्याचे आणि अशा अफवा पसरवू नयेत असे शुभमन गिलने सांगितले.