Sanjog Gupta ICC CEO : ICCच्या CEO पदावर संजोग गुप्ता यांची नियुक्ती, जागतिक क्रिकेटमध्ये भारतीयांची पुन्हा बाजी!

Published : Jul 07, 2025, 09:36 PM IST
sanjog gupta

सार

Sanjog Gupta ICC CEO : स्टार इंडिया आणि स्पोर्ट्स ब्रॉडकास्टिंग क्षेत्रातील दिग्गज संजोग गुप्ता यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर नियुक्ती झाली आहे. 

Sanjog Gupta ICC CEO : भारतीय क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय प्रभावात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. स्टार इंडिया आणि स्पोर्ट्स ब्रॉडकास्टिंग क्षेत्रात दीर्घ अनुभव असलेले संजोग गुप्ता यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ७ जुलै २०२५ पासून त्यांनी अधिकृतपणे ही जबाबदारी स्वीकारली.

संजोग गुप्ता यांनी ऑस्ट्रेलियाचे ज्योफ अ‍ॅलार्डिस यांची जागा घेतली आहे, जे २०२१ पासून CEO पदावर कार्यरत होते. विशेष म्हणजे संजोग गुप्ता हे ICCचे सातवे CEO ठरले असून, मनु साहनी यांच्या नंतर या पदावर नियुक्त होणारे फक्त दुसरे भारतीय आहेत.

संजोग गुप्ता यांचा प्रेरणादायी प्रवास, पत्रकार ते ICC CEO

संजोग गुप्ता यांचा कारकीर्दीचा प्रवास हा तरुणांसाठी प्रेरणादायी ठरावा असा आहे. त्यांनी आपल्या व्यावसायिक जीवनाची सुरुवात पत्रकारितेतून केली आणि २०१० मध्ये स्टार इंडिया मध्ये सामील झाले. त्यानंतर डिस्ने-स्टारचे क्रीडा प्रमुख म्हणून त्यांनी भारतीय क्रीडा क्षेत्रात मोठा बदल घडवून आणला. IPL, ISL, PKL आणि ICC स्पर्धा यांसारख्या विविध स्पर्धांमध्ये प्रेक्षकसंख्या आणि लोकप्रियता वाढवण्यामध्ये संजोग गुप्ता यांनी मोलाचा वाटा उचलला. जिओ सिनेमा (JioCinema) अंतर्गत त्यांनी थेट प्रसारणात नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून खेळ पाहण्याचा अनुभवच बदलून टाकला.

 

 

ICC अध्यक्ष जय शाह यांची प्रतिक्रिया

ICC चे अध्यक्ष जय शाह यांनी संजोग गुप्ता यांचे स्वागत करताना म्हटले की, “संजोग यांना क्रीडा नियोजन आणि व्यापारीकरणाचा सखोल अनुभव आहे. क्रिकेटबद्दलची त्यांची नाळ आणि तंत्रज्ञानाशी असलेली ओळख ही खेळाच्या जागतिक विस्ताराला निश्चितच चालना देईल. आम्ही अनेक उमेदवारांचा विचार केला, पण नामांकन समितीने एकमताने संजोग यांची निवड केली. ICC संचालक मंडळ त्यांच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे.”

ICC चे आतापर्यंतचे CEO जाणून घेऊयात

नाव              देश            कार्यकाळ

डेव्हिड रिचर्ड्स ऑस्ट्रेलिया 1993 – 2001

मॅल्कम स्पीड ऑस्ट्रेलिया 2001 – 2008

हारून लॉर्गट दक्षिण आफ्रिका 2008 – 2012

डेव्हिड रिचर्डसन दक्षिण आफ्रिका 2012 – 2019

मनु साहनी भारत 2019 – 2021

ज्योफ अ‍ॅलार्डिस ऑस्ट्रेलिया 2021 – 2025

संजोग गुप्ता भारत 2025 – सुरू

भारतीय नेतृत्वाची जागतिक क्रिकेटवर ठसठशीत छाप

जय शाह यांचं ICC चेअरमन पदावर असणं आणि आता संजोग गुप्ता यांची CEO म्हणून नियुक्ती हे दाखवून देतं की, भारतीय क्रिकेट आता केवळ खेळातच नव्हे तर प्रशासनातही आघाडीवर आहे. ICCसारख्या जागतिक संस्थेच्या नेतृत्वात भारतीयांची उपस्थिती ही भारताच्या वाढत्या क्रीडा सामर्थ्याची साक्ष आहे.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

'ऑस्ट्रेलिया दुबळ्यांसाठी नाही...', दारुण पराभवानंतर बेन स्टोक्स संतापला, क्रिकेटमध्ये संतापाची लाट!
स्मृती मानधनाचं लग्न मोडलं, स्वतःच सोशल मीडियावरून दिली माहिती