
बेंगळुरू (फे.०४) बेंगळुरूच्या वाहतुकीमध्ये वाहनांच्या छोट्या छोट्या धडका, भांडणे, वाद हे नेहमीचेच झाले आहे. याला माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड देखील अपवाद नाहीत. बेंगळुरूच्या वाहतुकीत थांबले असताना राहुल द्रविड यांच्या कारला एका मालवाहू ऑटोने धडक दिली. यामुळे कारमधून बाहेर आलेल्या राहुल द्रविड यांनी ऑटोचालकाच्या वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त केली. मात्र, ऑटोचालक वाद घालण्यास सुरुवात केल्याची घटना बेंगळुरूच्या कनिंगहॅम रोडवर घडली.
काम आटोपून राहुल द्रविड कनिंगहॅम रोडवरून आपल्या कारने प्रवास करत होते. ट्रॅफिक सिग्नलवर राहुल द्रविडसह अनेक वाहने थांबली होती. मात्र, एका मालवाहू ऑटोचालकाने थांबलेल्या राहुल द्रविड यांच्या कारला मागून धडक दिली. यामुळे राहुल द्रविड यांच्या कारचा दिवा फुटला आणि इतर भागांनाही ओरखडे पडले. मालवाहू ऑटोने कारला धडक देताच राहुल द्रविड कारमधून रस्त्यावर उतरले.
राहुल द्रविड बाहेर येऊन ऑटोचालकाला त्याच्या वर्तनाबद्दल विचारले. थांबलेल्या कारला धडक का दिलीत अशी नाराजी व्यक्त केली. मात्र, ऑटोचालकाने वाद घालण्यास सुरुवात केली. राहुल द्रविड यांच्याविरुद्ध आपली काहीही चूक नाही असा युक्तिवाद ऑटोचालकाने केला. मात्र, द्रविड यांचे ऐकण्यास नकार देत ऑटोचालकाने रस्त्यावर मोठा वाद घातला.
ऑटोचालकाशी बोलून काहीही फायदा नाही हे लक्षात आल्यावर राहुल द्रविड निघून गेले. याबाबत कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र, राहुल द्रविड यांच्याशी ऑटोचालकाने वाद घातल्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. रस्त्यावर सामान्य माणसांप्रमाणे राहुल द्रविड ऑटोचालकाशी बोलत असल्याचे आणि वाद घालत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यावर अनेक कमेंट्स येत आहेत. आता द्रविड यांच्याशी वाद घालणारा माणूस आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला असे अनेकांनी कमेंट केले आहे.
क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.