
Palash Muchhal Cheating Rumors : टीम इंडियाची बॅटर स्मृती मानधना आणि संगीत दिग्दर्शक, गायक पलाश मुच्छल यांचे लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. पण, हे लग्न पुढे ढकलले आहे की कायमचे मोडले आहे, या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. लग्नाच्या दिवशी स्मृती मानधनाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे लग्न पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर काही वेळातच स्मृती मानधनाचा होणारा पती पलाश मुच्छल देखील रुग्णालयात दाखल झाल्याने संशय निर्माण झाला होता.
दरम्यान, पलाश मुच्छलविषयी रोज नवनवीन गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. पलाश मुच्छलने स्मृतीची फसवणूक केली आणि तो रंगेहाथ पकडला गेल्याने लग्नाच्या दिवशीच हा निर्णय घेण्यात आला, असे सोशल मीडियावर म्हटले जात आहे. आता नव्या चर्चांनुसार, लग्नाच्या आदल्या दिवशी पलाश मुच्छलला त्याच्या एक्स-गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून स्मृती मानधनाची मैत्रीण आणि कर्नाटकची खेळाडू श्रेयंका पाटील आहे, असे समजते.
माझा एक्स-सिच्युएशनशिप एका प्रसिद्ध पीआर एजन्सीमध्ये काम करतो. स्मृतीबद्दलच्या चर्चांविषयी मी त्याच्याशी संपर्क साधला. मी इथे जे सांगत आहे ती कोणतीही काल्पनिक कथा नाही. ते त्यांच्या कामाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर याबद्दल चर्चा करत होते आणि त्यांनी मला ते चॅट्स दाखवले, असे युझरने लिहिले आहे.
गोष्ट अशी आहे की, पलाशने खरंच स्मृतीची फसवणूक केली आहे. आता तो रुग्णालयात दाखल झाल्याच्या बातम्या मॅनेज करण्यासाठी पीआर एजन्सींना पैसे देत आहे. रुग्णालयात दाखल झाल्याच्या बातम्यांवर लक्ष ठेवून आहे आणि आपले कृत्य लपवण्यासाठी मीम पेजेसनाही पैसे देत आहे. पण, आता काहीही उपयोग होत नाहीये, असेही युझरने लिहिले आहे.
या सगळ्याला नंदिका द्विवेदी नावाची मुलगी कारणीभूत आहे. लग्नाच्या दिवशी ती पलाशच्या बाजूला उभी होती. पलाशला डान्स शिकवण्यासाठी बॉस्कोच्या टीमने तिला नेमले होते, तर गुलनाज नावाची मुलगी स्मृतीसोबत काम करत होती. स्मृतीची जवळची मैत्रीण आणि खेळाडू श्रेयंका पाटीलने पलाश आणि त्या मुलीला अत्यंत जवळच्या क्षणी रंगेहाथ पकडले. त्यानंतर स्मृतीसमोरही दोघे रंगेहाथ सापडले.
यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये मोठे भांडण झाले. स्मृतीच्या भावाने पलाशवर हल्ला केल्याने तो थोडा जखमी झाला. त्यानंतर तिच्या वडिलांना छातीत दुखू लागले आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.
हे सर्व घडत असताना बहुतेक पाहुणे झोपले होते. सकाळी पाहुण्यांना सांगण्यात आले की, स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे लग्न रद्द करण्यात आले आहे. पण, स्मृती मात्र वेड्यासारखी रडत होती.
या सगळ्याला कारणीभूत असलेली ती डान्सर तिथून लगेच पळून गेली, तर पलाशलाही त्याचे कुटुंबीय मुंबईला घेऊन गेले. ॲसिडिटीमुळे रुग्णालयात दाखल होणे हे सर्व नाटक होते. या क्षणी स्मृतीचे आयुष्य खूप आनंदी असावे, एवढीच माझी इच्छा आहे. त्या मुलीने भोगलेला नरक कोणालाही मिळू नये. पण, देवाचे आभार मानायला हवेत की तिचे वडील आता बरे आहेत. तिच्या क्रिकेटपटू मैत्रिणी तिच्यासोबत आहेत. त्यांनी तिला कोणत्याही क्षणी सोडले नाही. त्या तिच्यामागे खंबीरपणे उभ्या आहेत.
आता मी किती निराश आहे हे देखील सांगतो. माझ्या एक्स-लव्हरचीही हीच परिस्थिती होती. त्याने माझी फसवणूक केली. मी त्याला दुसऱ्या मुलीला किस करताना पाहिले होते. तसेच, ही पोस्ट टाकल्याबद्दल कोणी मला कायदेशीर नोटीस पाठवेल का, याची मला थोडी भीती वाटत आहे. मी हे डिलीट करावे का? कृपया मला सांगा.