Joe Root Record: जो रूटने मोडला सचिनचा मोठा विक्रम! आता पॉन्टिंग आणि कॅलिसच्या पंक्तीत स्थान

vivek panmand   | CMS
Published : Sep 12, 2026, 11:15 PM IST
joe root

सार

इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूटने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा एक मोठा विक्रम मोडला आहे. रूटने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकं करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

नवी दिल्ली: इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूटने क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा एक मोठा कसोटी विक्रम मोडला आहे. रूटने आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकं करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याने ही कामगिरी केली. या सामन्यात रूटने नाबाद ६२ धावांची खेळी करत इंग्लंडला विजय मिळवून दिला. या अर्धशतकासह रूटच्या नावावर आता कसोटीत ६९ अर्धशतकं झाली आहेत, तर सचिन ६८ अर्धशतकांसह दुसऱ्या स्थानी घसरला आहे.

या यादीत वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू शिवनारायण चंद्रपॉल ६६ अर्धशतकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ॲलन बॉर्डर आणि भारताची 'द वॉल' राहुल द्रविड ६३ अर्धशतकांसह चौथ्या स्थानी आहेत. ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार रिकी पाँटिंगने कसोटीत ६२ अर्धशतकं झळकावली आहेत.

एजबॅस्टन कसोटीत इंग्लंडसमोर १३० धावांचं लक्ष्य होतं. इंग्लंडने हे लक्ष्य फक्त दोन विकेट्स गमावून सहज पार केलं. रूटने नाबाद ६२ धावा केल्या, तर जॉर्डन कॉक्सनेही नाबाद ५९ धावा करत त्याला उत्तम साथ दिली. या विजयासह इंग्लंडने कसोटी मालिका ३-० अशा फरकाने जिंकली.

याच सामन्यात रूटने आणखी एक विक्रम केला. तो एजबॅस्टन मैदानावर एक हजार कसोटी धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. इतकंच नाही, तर चार वेगवेगळ्या मैदानांवर एक हजारांपेक्षा जास्त धावा करण्याचा पराक्रमही त्याने केला आहे. लॉर्ड्सवर २२०३ धावा, मँचेस्टरमध्ये ११२८ धावा आणि ओव्हलवर १०५० धावा त्याने केल्या आहेत. रूटच्या आधी अशी कामगिरी फक्त दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिस आणि ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंग यांनी केली आहे.

PREV

क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.

Read more Articles on

Recommended Stories

Gen Z Indian Cricketers : रोहित-विराटनंतर आता यांचीच हवा; कमाई ऐकून थक्क व्हाल
Hardik Pandya Fan: २३०० किमी पायी चालत आलेल्या फॅनला हार्दिकने दिलं खास गिफ्ट