Asian Games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला पहिलं सुवर्ण, महिला क्रिकेटमध्ये श्रीलंकेचा 147 धावांनी धुव्वा

Published : Sep 22, 2026, 02:25 PM IST
Asian Games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला पहिलं सुवर्ण, महिला क्रिकेटमध्ये श्रीलंकेचा 147 धावांनी धुव्वा

सार

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाला स्मृती मानधना आणि शेफाली वर्माने स्वप्नवत सुरुवात करून दिली. याच जोरावर भारताने सुवर्णपदकावर नाव कोरलं.

नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आपलं पहिलं सुवर्णपदक जिंकलं आहे. स्मृती मानधना, शेफाली वर्मा आणि रिचा घोष यांची तुफानी फलंदाजी आणि फिरकीपटूंच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने हा दणदणीत विजय मिळवला.

प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ३ गडी गमावून २१६ धावांचा डोंगर उभारला. याला उत्तर देताना श्रीलंकेचा संघ १५.४ षटकांत अवघ्या ६९ धावांवर गारद झाला. श्रीलंकेकडून कर्णधार चमारी अथापथूने २९, कविशा दिलहारीने ११ आणि कौशानी नुथ्यंगनाने १४ धावा केल्या. या तिघींशिवाय कोणालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. भारताकडून दीप्ती शर्माने ३, तर शेफाली वर्मा, श्रेयांका पाटील आणि श्रीचारिणी यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

स्कोअर: भारत २० षटकांत २१६/३, श्रीलंका १५.४ षटकांत ६९ सर्वबाद.

याआधी, नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर स्मृती मानधना आणि शेफाली वर्माने संघाला धडाकेबाज सुरुवात करून दिली. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी १० षटकांत ९९ धावांची भागीदारी केली. स्मृतीने ४५ चेंडूत ५ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ७९ धावा कुटल्या. या खेळीसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ११,००० धावा पूर्ण करणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

दुसरीकडे, शेफालीने ४८ धावांचे योगदान दिले. शेवटच्या षटकांमध्ये रिचा घोषने अवघ्या २२ चेंडूत नाबाद ४९ धावा चोपल्या. यामुळे भारताने २० षटकांत ३ बाद २१६ अशी मजल मारली. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या महिला क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

२१७ धावांच्या महाकाय लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ कधीच सामन्यात दिसला नाही. फलंदाजीत चमकलेल्या शेफाली वर्माने गोलंदाजीतही सुरुवातीलाच दोन धक्के देत श्रीलंकेची अवस्था बिकट केली. श्रीलंकेची एकमेव आशा असलेल्या कर्णधार चमारी अथापथूला (२९) दीप्ती शर्माने बाद केलं आणि श्रीलंकेचा उरलासुरला प्रतिकारही संपुष्टात आला.

दीप्ती शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेचा डाव अवघ्या ६९ धावांत गुंडाळला. १४७ धावांच्या या मोठ्या विजयासह भारतीय महिलांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. सध्या १ सुवर्ण, ४ रौप्य आणि २ कांस्य अशा एकूण ७ पदकांसह भारत पदक तालिकेत आठव्या स्थानावर आहे.

PREV

क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.

Read more Articles on

Recommended Stories

Matt Renshaw: मॅट रेनशॉची झुंजार खेळी, संकटात सापडलेल्या ऑस्ट्रेलियासाठी ठरला 'तारणहार'
Sanju Samson: संजू सॅमसनची टीकाकारांना चपराक, रांचीत ठोकल्या वादळी 82 धावा